पोहेगावात ३० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:21 IST2021-05-07T04:21:03+5:302021-05-07T04:21:03+5:30
कोपरगाव : तालुक्यातील पोहेगाव येथे ग्रामपंचायत व पोहेगाव नागरी पतसंस्था व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील जिल्हा ...

पोहेगावात ३० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू
कोपरगाव : तालुक्यातील पोहेगाव येथे ग्रामपंचायत व पोहेगाव नागरी पतसंस्था व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तीस बेडचे कोविड सेंटरचे पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन बडदे यांच्या हस्ते मंगळवारी कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शिवसेना नेते नितीन औताडे, सरपंच अमोल औताडे, प्रदीप औताडे, राजेंद्र औताडे, डॉ. सुनील मेहेत्रे, डॉ. जगदीश झंवर, डॉ. नितीन गवळी, डॉ. आनंद काळे, डॉ. घनश्याम गोडगे, डॉ.नरेंद्र होन, रवींद्र औताडे, राजेंद्र कोल्हे, पंकज औताडे, लखन औताडे, श्रीकांत रांधव, नीलेश वाके, राजेंद्र कोल्हे, ग्रामविकास अधिकारी रामदास काळे उपस्थित होते. यावेळी नीलेश वाके, डॉ. दुर्वास कुरकुटे, राजेंद्र कोल्हे यांनी कोविड सेंटरसाठी प्रत्येकी पाच बेड उपलब्ध करून दिले. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने २१ हजारांची देणगी देण्यात आली. डॉ. बडदे म्हणाले, या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मोफत नाश्ता, चहा, दोन वेळचे जेवण, तसेच वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत. परिसरातील नागरिकांना शारीरिक थोडाही त्रास झाला तरी त्यांनी आपली कोविड टेस्ट करून घ्यावी. पोहेगाव येथे सुरू झालेल्या कोविड सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात विश्रांती घ्यावी.
------------
कोरोनाबाधित रुग्णांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जम्बो कोविड सेंटर आहेत. मात्र, मनात भीती असल्याने ग्रामीण भागातील रुग्ण तेथे जात नाहीत. परिणामी बाधित रुग्ण स्वत:बरोबर आपल्या कुटुंबालाही बाधित करण्याचा धोका निर्माण करतात. कोरोनाला घाबरून न जाता वेळीच उपचार घेतल्यास रुग्ण बरे होतात. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सर्व सुविधांयुक्त कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.
- नितीन औताडे, शिवसेना नेते.