ढाकणे पॉलिटेक्निकचा निकाल ९५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:47 IST2021-09-02T04:47:03+5:302021-09-02T04:47:03+5:30

काॅलेजचा प्रथम वर्ष अभियांत्रिकीचा निकाल ९४.८१ टक्के, द्वितीय वर्षाचा निकाल ९७.०३ टक्के, तर तृतीय वर्षाचा निकाल ९७.६७ टक्के लागला ...

Cover Polytechnic result 95% | ढाकणे पॉलिटेक्निकचा निकाल ९५ टक्के

ढाकणे पॉलिटेक्निकचा निकाल ९५ टक्के

काॅलेजचा प्रथम वर्ष अभियांत्रिकीचा निकाल ९४.८१ टक्के, द्वितीय वर्षाचा निकाल ९७.०३ टक्के, तर तृतीय वर्षाचा निकाल ९७.६७ टक्के लागला असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.श्रीकांत ढाकणे यांनी दिली आहे.

प्रथम वर्षातील माधुरी सर्जे ही विद्यार्थिनी ७५.६० टक्के गुणांसह प्रथम, द्वितीय वर्षात शुभम केकते ८६.०६ टक्के गुणांसह प्रथम, तर तृतीय वर्षातून तुषार वडे हा ८५.६३ टक्के गुणांसह प्रथम आला. ७७ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले असून, २८३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. तंत्रनिकेतनचा एकूण निकाल ९५ टक्के लागला आहे. प्रथम वर्ष सिव्हिलमध्ये सोनाली भालेराव (७२.७३), द्वितीय वर्षमध्ये विनय खेडकर (७९.५९), तर तृतीय वर्षमध्ये तुषार बडे (८५.६३) प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. प्रथम वर्ष कॉम्प्युटरमध्ये माधुरी सर्जे (७५.६०), द्वितीय वर्षात किरण दांडगे (८०.४०), तर तृतीय वर्षामध्ये पीयूष दौड (८३.०९) प्रथम आले. द्वितीय वर्ष ई ॲण्ड टीसीमध्ये अभिषेक मडके, तृतीय वर्षामध्ये नितीन तांदळे प्रथम आले. प्रथम वर्ष मेकॅनिकलमध्ये श्रीकांत बावर, द्वितीय वर्षामध्ये शुभम केकते, तर तृतीय वर्षात ऋषिकेश रोटकर प्रथम आले.

विभागप्रमुख प्रा.महेश मरकड, प्रा.सचिन म्हस्के, प्रा.संपदा उरणकर, प्रा.सुनील औताडे यांनी विशेष प्रयत्न केले. प्रा.विश्वास घुटे, प्रा.संकेत मोटाले, प्रा.संदीप बोराळे, प्रा.पूजा गव्हाणे, प्रा.अश्विनी गोरे, प्रा.आसाराम भिसे, प्रा.विलास प्रभुणे, प्रा.शीतल ब्राह्मणे, प्रा.कैलास खुरुद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे, सचिव जया राहाणे, समन्वयक प्रा.ऋषिकेश ढाकणे, प्राचार्य डॉ.आर.एच अत्तार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतूक केले.

Web Title: Cover Polytechnic result 95%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.