ज्येष्ठांसाठी कोव्हॅक्सीन डोस उपलब्ध करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:22 IST2021-05-09T04:22:23+5:302021-05-09T04:22:23+5:30

अहमदनगर : ज्येष्ठांसाठी कोव्हॅक्सिन लस तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सभागृह नेते रवींद्र बारस्कर यांनी महापालिका आयुक्त शंकर ...

Covacin doses should be made available for seniors | ज्येष्ठांसाठी कोव्हॅक्सीन डोस उपलब्ध करावेत

ज्येष्ठांसाठी कोव्हॅक्सीन डोस उपलब्ध करावेत

अहमदनगर : ज्येष्ठांसाठी कोव्हॅक्सिन लस तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सभागृह नेते रवींद्र बारस्कर यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे व जिल्हा परिषदेकडे केली आहे.

याबाबत बारस्कर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रात कोव्हॅक्सीनचे डोस गेल्या काही दिवसांपासून उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ४५ वयाच्या पुढील ज्या जेष्ठांनी पहिला डोस घेतला असेल व दुसऱ्या डोसची मुदत संपली आहे. अशा नागरिकांना मानसिक त्रास होत आहे. बरेच ज्येष्ठ नागरिक ३ ते ४ केंद्रांवर जाऊन कोव्हॅक्सीन लस आहे का? याची चौकशी करत आहेत. त्यामुळे शारीरिक धावपळ होत आहे. या विषयावर लवकरच सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे महापालिका केंद्रावर दुसऱ्या डोससाठी ज्येष्ठांसाठी कोव्हॅक्सीन लस उपलब्ध होईल, असे बारस्कर यांनी सांगितले.

गेल्या एक महिन्यापासून कोव्हॅक्सीन लसीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्यामुळे काही ज्येष्ठ नागरिकांनी पहिला डोस कोव्हॅक्सीन लसीचा घेतला आहे. त्यासाठी तरी दुसरा डोस मिळण्यासाठी ज्येष्ठांना वारंवार लसीकरण केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहेत. तरीसुद्धा ही कोव्हॅक्सीन लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Web Title: Covacin doses should be made available for seniors