न्यायालयाचे मत मंदिराबाबत, चौथऱ्यावर नाही

By Admin | Updated: March 31, 2016 00:04 IST2016-03-31T00:02:19+5:302016-03-31T00:04:06+5:30

सोनई : मंदिरात जाऊन दर्शन घेणे हा महिलांचा अधिकार आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. न्यायालयाच्या या मताबाबत शिंगणापूरातून सावध भूमिका व्यक्त करण्यात आली आहे.

The court's opinion is not about the temple, on the square | न्यायालयाचे मत मंदिराबाबत, चौथऱ्यावर नाही

न्यायालयाचे मत मंदिराबाबत, चौथऱ्यावर नाही

सोनई : मंदिरात जाऊन दर्शन घेणे हा महिलांचा अधिकार आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. न्यायालयाच्या या मताबाबत शिंगणापूरातून सावध भूमिका व्यक्त करण्यात आली आहे. शनिदेवाच्या मंदिरात महिलांना प्रवेश असून चौथाऱ्यावरील प्रवेशाबाबत न्यायालयाने भाष्य केलेले नाही. त्यामुळे सरकार न्यायालयात काय निवेदन करतेय ते पाहून पुढील दिशा ठरेल, असे देवस्थानचे सहायक कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले यांनी सांगितले.
न्यायालयाच्या मतप्रदर्शनाची शिंगणापूर परिसरात जोरदार चर्चा आहे. यासंदर्भात देवस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे म्हणाल्या, कोर्टाचा लेखी आदेश पाहिल्याशिवाय याबाबत आपणाला मतप्रदर्शन करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. सहाय्यक कार्यकारी अधिकाऱ्यांनी शनिच्या मंदिरात स्त्री-पुरुष या दोघांनाही प्रवेश दिलाच जात असल्याकडे लक्ष वेधले. शिंगणापूरचे सरपंच बाळासाहेब बानकर यांनी स्त्री आणि पुरुष असा कुठलाही भेदभाव येथील मंदिरात नाही, मात्र चौथाऱ्याबाबत ग्रामस्थांची वेगळी भूमिका असल्याचे सांगितले.
शनिचौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा, या मागणीसाठी अंनिसचा लढा गेल्या १५ वर्षांपासून सुरू आहे़ २००० मध्ये डॉ़ दाभोळकर, श्रीराम लागू, पुष्पा भावे यांना अटक झाली होती़ न्यायालयाचा निर्णय म्हणजे या लढ्याचे यश आहे.
-रंजना गवांदे,
जिल्हा कार्याध्यक्षा, अंनिस
महिलांना मंदिरात प्रवेश देण्यासंदर्भात न्यायालयाने राज्य शासनाला म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. शनी चौथऱ्यावरील महिला प्रवेशाबाबत आदेश झाल्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शिंगणापूर देवस्थान बचाव कृती समितीची भूमिका आहे.
-संभाजी दहातोंडे,शिंगणापूर देवस्थान बचाव कृती समिती, अध्यक्ष

Web Title: The court's opinion is not about the temple, on the square