थकबाकीदारांना मिळाल्या न्यायालयाच्या नोटीसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:24 IST2021-09-24T04:24:19+5:302021-09-24T04:24:19+5:30
सध्या गावातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी नाही. ग्रामस्थ विकत पाणी घेत आहेत. गेल्या पंधरा दिवसात गावात लाळ्या खुरखुत या ...

थकबाकीदारांना मिळाल्या न्यायालयाच्या नोटीसा
सध्या गावातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी नाही. ग्रामस्थ विकत पाणी घेत आहेत. गेल्या पंधरा दिवसात गावात लाळ्या खुरखुत या आजाराने सरासरी ४० जनावरे दगावली. यामध्ये ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. या अडचणींमुळे गावातील माजी उपसरपंच भारत राऊत, भाजप माजी तालुका उपाध्यक्ष संदीप गमे, समाजसेवक बाळासाहेब गमे, प्रहारचे भाऊनाथ गमे, सदस्य बाप्पू राऊत, अंजाबाप्पू जटाड, अनिल गुंजाळ,बी. टी. गमे यांनी ग्रामपंचायतला विचारणा केली आहे. याबाबत गावच्या सरपंच संगीता कांदळकर यांच्याशी संपर्क होत नाही.
------------
ग्रामपंचायतचा सावळा गोंधळ
सहा हजारांच्या पुढे पट्टी बाकी असलेल्या थकबाकीदारांच्या पट्ट्या गोळा करण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला आहे; परंतु सहा हजाराच्या आत पट्टी भरलेली असतानाही ग्रामस्थांना नोटिसा आल्यामुळे ही बाब ग्रामस्थांनी ग्रामपंचायतपुढे व्यक्त केल्यानंतर ग्रामपंचायतने सारवासारव केली आहे.
-------------
पूर्वकल्पना नाही
ग्रामस्थांनी पट्टी भरावी याविषयी कुठलीही पूर्वकल्पना दिली नाही. गेल्या शनिवारी गावात ग्रामसभा घेण्यात आली; परंतु यावेळी न्यायालयीन विषयावर चर्चा केली नाही. त्यामुळे ग्रामसभेत ग्रामस्थांच्या हक्कावर ग्रामपंचायतने गदा आणली आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामपंचायत माजी सदस्य अंजाबाप्पू जटाड व संदीप गमे यांनी व्यक्त केली.
---------
सध्या ग्रामपंचायतकडून हुकूमशाही राजवट चालू आहे. ग्रामस्थ घाबरले आहेत. ग्रामस्थांना पहिल्यांदा ग्रामपंचायतने न्यायालयात खेचले आहे.
- भारत राऊत, माजी उपसरपंच, केलवड ग्रामपंचायत.
............
वसूल करण्यासाठी राहाता दिवाणी न्यायालयात अर्ज करायचा, याविषयीचा ठराव १३ ऑगस्ट व १४ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत मासिक मीटिंगमध्ये घेण्यात आला होता, इतर गावांमध्ये हा प्रकार सुरू आहे.
- वाय. ए . देशमुख, ग्रामविकास अधिकारी.