श्रीरामपुरात मोजमोजणीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:18 IST2021-01-18T04:18:52+5:302021-01-18T04:18:52+5:30

श्रीरामपूर : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी मुख्य प्रशासकीय इमारतीत मतमोजणी होत आहे. त्याकरिता प्रशासनाने तयारी पूर्ण केली असल्याची ...

For counting at Shrirampur | श्रीरामपुरात मोजमोजणीसाठी

श्रीरामपुरात मोजमोजणीसाठी

श्रीरामपूर : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी मुख्य प्रशासकीय इमारतीत मतमोजणी होत आहे. त्याकरिता प्रशासनाने तयारी पूर्ण केली असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली. सोमवारी सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्याकरिता १४ टेबल लावण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलवर मतमोजणी अधीक्षक, सहायक मतमोजणी अधिकारी व शिपाई अशा तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १४ टेबलवर ४२ कर्मचारी मतमोजणीची प्रक्रिया पार पाडणार आहेत. नायब तहसीलदार दीपक गोवर्धने यांच्या नेतृत्वाखाली सहाजणांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.

राज्य राखीव दलाचे ५५ कर्मचारी मतमोजणीकरिता तैनात करण्यात आले आहेत. एकूण ११ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पार पडणार आहे. ५७७ उमेदवार रिंगणात आहेत. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याचा अंदाज आहे.

-----------

Web Title: For counting at Shrirampur