पुण्यात जि़ प़ पदाधिका-यांची उद्या परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 13:27 IST2017-09-07T13:27:33+5:302017-09-07T13:27:33+5:30

अहमदनगर : राज्यातील जिल्हा परिषद पदाधिका-यांची विकास परिषदेला उद्या शुक्रवारी पुण्यात प्रारंभ होणार आहे़ राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांसह ...

Councilors of the Zilla Parishad tomorrow | पुण्यात जि़ प़ पदाधिका-यांची उद्या परिषद

पुण्यात जि़ प़ पदाधिका-यांची उद्या परिषद

अहमदनगर : राज्यातील जिल्हा परिषद पदाधिका-यांची विकास परिषदेला उद्या शुक्रवारी पुण्यात प्रारंभ होणार आहे़ राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांसह उपाध्यक्ष उपस्थित राहणार असून, या परिषदेत जिल्हा परिषदेच्या विविध समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे़
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, अन्न व पुरवठा मंत्री गिरीष बापट या विकास परिषदेला उपस्थित राहणार आहे़ अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने अध्यक्षा शालिनी विखे व उपाध्यक्षा राजश्री घुले परिषदेला हजर राहणार आहेत़ नगर तालुक्यातील निंबोडी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा खोल्यांसाठीचा ८१ कोटींचा प्रस्ताव यावेळी मंत्र्यांना सादर केला जाणार असल्याचे अध्यक्षा विखे यांनी सांगितले़

Web Title: Councilors of the Zilla Parishad tomorrow