शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

सेवेसाठी महामंडळ सज्ज; पण शेवगाव बसस्थानकात प्रवाशांच्या प्रतीेक्षेत लालपरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 12:46 IST

लॉकडाऊनमधून सरकारने शिथीलता देतांना राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेसला जिल्ह्यातर्गंत प्रवासी वाहतूक करण्यास मुभा दिली आहे. मंडळाने सर्व गाड्या सज्ज करताना सॅनिटाईझ करुन प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बसस्थानकात आणून उभ्या केल्या. मात्र प्रवाशांच्या प्रतीक्षेत बस स्थानकात उभ्या असल्याचे चित्र आहे.

शेवगाव : लॉकडाऊनमधून सरकारने शिथीलता देतांना राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेसला जिल्ह्यातर्गंत प्रवासी वाहतूक करण्यास मुभा दिली आहे. मंडळाने सर्व गाड्या सज्ज करताना सॅनिटाईझ करुन प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बसस्थानकात आणून उभ्या केल्या. मात्र प्रवाशांच्या प्रतीक्षेत बस स्थानकात उभ्या असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (२२ मे) सकाळी बसस्थानकात प्रवासी वर्गाअभावी शुकशुकाट पाहिला मिळत होता. निर्जंतुकीकरण केलेल्या बस अहमदनगर, श्रीरामपूरकडे जाणा-या प्रवाशाकरिता स्थानकात सज्ज होत्या. मात्र प्रवासी वर्ग बसस्थानकाकडे फिरकलाच नाही. त्यामुळे नियोजित फेºया रद्द कराव्या लागल्या. अहमदनगर व श्रीरामपूरकडे जाणा-या प्रवाशांच्या सेवेसाठी प्रत्येकी १२ फेºयांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र सकाळच्या सुमारास प्रवासासाठी कोणीच प्रवासी न आल्याने अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या चेह-यावर चिंतेचे भाव दिसून येत होते. प्रवासी वर्गाची सुरक्षितेची काळजी घेताना सर्व बस दुरुस्ती करीत चांगल्या प्रकारे धुवून घेत, निर्जंतुकीकरण करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या स्वागतासाठी महामंडळाचे प्रशासन सज्ज होते. आगारप्रमुख देवराज यांनी लॉकडाऊनपूर्वी शेवगाव आगारचा बस दररोज राज्यातील विविध भागात सर्व साधारणपणे २० हजार किलोमीटर फिरुन प्रवासी वाहतूक करीत होत्या. मागील गत दोन महिन्यात शेवगाव आगाराला साडेतीन कोटींचे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांना व दहा वषार्खालील मुलांना प्रवास करता येणार नसल्याचे सांगितले. प्रवाश्यांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर असून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व काळजी घेतली जाईल, असे शेवगावचे आगाराप्रमुख देवराज यांनी सांगितले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याShevgaonशेवगाव