Coronavirus : धक्कादायक : नगरमधील कोरोना रुग्णाचा पुण्यात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 14:40 IST2020-04-10T14:39:30+5:302020-04-10T14:40:41+5:30
श्रीरामपूर येथील मतिमंद कोरोनाबाधित रुग्णाचा पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना आज सकाळी मृत्यू झाला.

Coronavirus : धक्कादायक : नगरमधील कोरोना रुग्णाचा पुण्यात मृत्यू
अहमदनगर : श्रीरामपूर येथील मतिमंद कोरोनाबाधित रुग्णाचा पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना आज सकाळी मृत्यू झाला.
श्रीरामपूर येथील मतिमंद रुग्णाला प्राथमिक सर्दी, खोकल्याची लक्षणे दिसत असल्याने त्याला प्रथम अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी पाठविलेला त्याचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु जास्त त्रास होत असल्याने त्याला चार दिवसांपुर्वी पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे दाखल झाल्यानंतर त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला.
दरम्यान उपचार घेत असताना आज सकाळी मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने त्याच्या मृत्यूस दुजोरा दिला.