कोरोनाबाधितांनी गृहविलगीकरणात राहू नये अन्यथा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:21 IST2021-05-23T04:21:19+5:302021-05-23T04:21:19+5:30
तिसगाव : कोरोनाबाधित रुग्णांनी घरात न राहता डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर अथवा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेऊन राहावे. ...

कोरोनाबाधितांनी गृहविलगीकरणात राहू नये अन्यथा गुन्हा
तिसगाव : कोरोनाबाधित रुग्णांनी घरात न राहता डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर अथवा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेऊन राहावे. संबंधित कोरोनाबाधित व्यक्ती घरात विलगीकरणात ्आढळल्यास गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांनी दिला.
तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जगदीश पालवे, विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे, दादासाहेब शेळके, बाळासाहेब तिडके, प्रमोद मस्के यांनी अचानक तालुक्यातील वेगवेगळ्या गावात जाऊन पाहणी केली. त्यांनी जे रुग्ण गृह विलगीकरणात राहत असतील त्यांना तत्काळ त्यांच्यातील लक्षणानुसार कोविड सेंटर किंवा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्षात जावे, असे सांगण्यात आले.
खिंडे म्हणाल्या, काेरोनाबाधिताने कोणीही गृह विलगीकरणात राहू नये. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असेल किंवा कोरोनासदृश लक्षणे आहेत त्यांनी तत्काळ कोविड केअर सेंटर अथवा रुग्णालय तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत स्वतःहून विलगीकरण करावे व उपचार घ्यावेत. यामुळे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. कुटुंबातील व गावातील इतर व्यक्तींना कोरोना रोगाची बाधा होणार नाही.