कोरोनात नोंदणी विवाहालाच तरुणाईची पसंती
By | Updated: December 9, 2020 04:16 IST2020-12-09T04:16:16+5:302020-12-09T04:16:16+5:30
अहमदनगर : विवाह झाल्यानंतर त्याची विवाह नोंदणी महापालिकेत केली जाते. कोरोनामुळे यंदा विवाहांची संख्या घटल्याने विवाह नोंदणीची संख्याही घटली ...

कोरोनात नोंदणी विवाहालाच तरुणाईची पसंती
अहमदनगर : विवाह झाल्यानंतर त्याची विवाह नोंदणी महापालिकेत केली जाते. कोरोनामुळे यंदा विवाहांची संख्या घटल्याने विवाह नोंदणीची संख्याही घटली आहे. दुसरीकडे कोरोनाच्या नियमांचे पालन करणे कठीण असल्याने नोंदणी पद्धतीने लग्न (रजिस्टर मॅरेज) करण्याकडे कल वाढला आहे. कोरोनामुळे दोन ते तीन महिने नोंदणी कार्यालय बंद असले तरी नोंदणी पद्धतीने केल्या जाणाऱ्या विवाह संख्येत घट झाली नसल्याचे दिसून आले आहे.
यंदा जानेवारीपासून विवाहाच्या तारखा असल्या तरी वर्षाचे पहिले तीन महिने वगळले तर संपूर्ण २०२० हे वर्ष कोरोनाच्या संकटात संपले आहे. कोरोनामुळे अनेकांचे विवाह लांबले. काहींनी कोरोनाची साथ संपल्यानंतर धूमधडाक्यात लग्न लावण्याचा निर्णय घेतला, तर अनेकांनी नोंदणी पद्धतीने विवाह करून वैवाहिक जीवनात पदार्पण केले. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे उपनिबंधक कार्यालये तीन महिने बंद होती. अनलॉक सुरू झाला तरी फारसा प्रतिसाद नव्हता. मात्र, नोंदणी पद्धतीने केलेल्या विवाह संख्येत गतवर्षीच्या तुलनेत कोणतीही घट झालेली नसल्याचे दिसते आहे. कोरोनामुळे तरुणांनी नोंदणी पद्धतीने विवाह करण्यावर भर दिल्याचे दिसते आहे.
--------------
कोरोनाच्या काळात २-३ महिने कार्यालय बंद असले तरी गतवर्षीच्या तुलनेत नोंदणी विवाहांच्या संख्येत अजिबात घट झालेली नाही. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी तरुण व त्यांच्या पालकांनी नोंदणी पद्धतीने विवाह करण्यावर भर दिल्याचे दिसून येते. विवाहाची ही पद्धत अनेकांना सोयीची वाटली, हेच यातून दिसून आले.
-शरद झोटिंग, सह दुय्यम निबंधक वर्ग-२ व विवाह अधिकारी, अहमदनगर
-------------
अहमदनगर शहराच्या हद्दीत जे विवाह होतात त्याची नोंद महापालिकेत केली जाते. काही विवाह झाल्यानंतर लगेच नोंदणी करतात, तर अनेक जण २०-२५ वर्षे झाले तरी विवाहाची नोंदणी करताना दिसत नाहीत. कोरोनाच्या साथीमुळे विवाह झालेल्यांनी नोंदणीकडे पाठ फिरवलेली दिसते. गतवर्षीच्या तुलनेत यंदाची आकडेवारी कमी झाली आहे.
-डॉ. अनिल बोरडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका
-----------------
नोंदणी पद्धतीने झालेले विवाह (रजिस्टर मॅरेज)
वर्ष विवाह संख्या
जाने. ते डिसेंबर २०१९ ३८९
जाने. ते ७ डिसेंबर २०२० ३५३
-------------------
महापालिकेत झालेल्या विवाहांची नोंदणी
वर्ष विवाह संख्या
जाने. ते डिसेंबर २०२९ ५८४
जाने. ते डिसेंबर २०२० ४१७
-----------
फोटो-०८ विवाह नोंदणी
नेट फोटोत ०८मॉरेज रडिस्ट्रेशन डमी