शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे शिर्डीत भाविकांविना रामजन्मोत्सव साजरा; संस्थानने भाविकांना दिला सुरक्षेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 13:02 IST

सोशल डिस्टन्सींग व फेस मास्कच्या माध्यमातून सुरक्षेची काळजी घेत साईबाबा संस्थानने गुरुवारी (दि.२ एप्रिल) रामजन्मदिनी कोरोना रूपी रावणाला अंगठा दाखविला. जगभरातील करोडो भाविकांना कोरोनापासून काळजी घेण्यासाठी योग्य तो संदेश संस्थानने दिला. भाविकांविना रामजन्म उत्सव साजरा साजरा केला.

शिर्डी : सोशल डिस्टन्सींग व फेस मास्कच्या माध्यमातून सुरक्षेची काळजी घेत साईबाबा संस्थानने गुरुवारी (दि.२ एप्रिल) रामजन्मदिनी कोरोना रूपी रावणाला अंगठा दाखविला. जगभरातील करोडो भाविकांना कोरोनापासून काळजी घेण्यासाठी योग्य तो संदेश संस्थानने दिला. भाविकांविना रामजन्म उत्सव साजरा साजरा केला.    श्रीरामनवमी साईसंस्थानचा प्रमुख उत्सव असलेल्या रामनवमी उत्सवासाठी शेकडो पालख्यांद्वारे हजारो पदयात्री येत असतात. उत्सवातील लाखो भाविकांची उपस्थिती, साईनामाचा गजर, ढोल-ताशांचे आवाज, फटाक्यांची आतषबाजी, फुले, गुलालाची उधळण, रथ मिरवणुकीत भाविकांच्या उत्साहाला येणारे उधाण, कावडीने गोदाजल आणून साईसमाधीला घालण्यात येणारे स्रान व या सर्व कार्यक्रमातून भाविकांना मिळणारा आनंद कोरोनाने हिरावून घेतला.    यंदाचा रामनवमी उत्सव मंदिरातील चार भिंतीच्या आत सुरू आहे.  बुधवारी द्वारकामाईतील अखंड पारायणाची गुरुवारी सकाळी सांगता झाली. यानंतर द्वारकामाईतून गुरूस्थानमार्गे समाधी मंदिरात मिरवणूक काढण्यात आली. यात संस्थानचे सीईओ अरूण डोंगरे यांनी विणा, डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे यांनी ग्रंथ तर प्रशासकीय अधिकारी डॉ़आकाश किसवे व अशोक औटी यांनी साईप्रतिमा धरून सहभाग घेतला. यावेळी अंजली डोंगरे, वैशाली ठाकरे, प्रशासकीय अधिकारी सूर्यभान गमे, संरक्षण अधिकारी मधुकर गंगावणे अनावश्यक उपस्थित होते.    डोंगरे दाम्पत्याच्या हस्ते साईसमाधीची पाद्यपूजा करण्यात आली. यानंतर द्वारकामाईतील गव्हाच्या पोत्याचे पूजन करून ते बदलण्यात आले. लेंडी बागेतील शताब्दी ध्वजही बदलण्यात आला. साईबाबांनी १८९७ साली शिर्डीत उरूस सुरू केला. तेव्हापासून द्वारकामाईवर निमोणकर व रासणे परिवाराकडून निशाण लावण्याची व कोंडाजी सुताराच्या वशंजाच्या घरापासून त्याची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. १२३ वर्षांची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी निमोणकरांच्या वतीने संस्थानने स्वत:च हे निशाण तयार करवून लावण्याचा निर्णय घेतला. रासणेंनी कालच आपले निशाण पाठवले.    उत्सवात मुख्य दिवशी मंदिर रात्रभर उघडे ठेवण्याची प्रथाही आज मोडून शेजारतीनंतर मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. हुबळी येथील भाविक अंबली यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची सजावट करण्यात आली होती. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीSaibaba Mandirसाईबाबा मंदिरcorona virusकोरोना वायरस बातम्या