जेऊरमध्ये कोरोनाचे पुनरागमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:19 IST2021-03-07T04:19:07+5:302021-03-07T04:19:07+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथे तब्बल चार महिन्यांच्या अवधीनंतर कोरोनाचा रुग्ण सापडला. त्यामुळे गावामध्ये कोरोनाचे पुनरागमन झाले. जेऊर ...

जेऊरमध्ये कोरोनाचे पुनरागमन
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथे तब्बल चार महिन्यांच्या अवधीनंतर कोरोनाचा रुग्ण सापडला. त्यामुळे गावामध्ये कोरोनाचे पुनरागमन झाले.
जेऊर गणात सर्वप्रथम डोंगरगण येथे कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर, जेऊर येथे जून, २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसून आले. त्यानंतर, या परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. ऑक्टोबर, २०२० नंतर जेऊर गावामध्ये एकही रुग्ण आढळून आला नव्हता. तब्बल चार महिन्यांच्या कालावधीनंतर चालू आठवड्यात जेऊर गावांमध्ये रुग्ण आढळून आल्याने, खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या १६ गावांमध्ये आजतागायत ३९८ रुग्ण आढळून आलेले आहेत. १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.
---
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, नागरिकांनी आपली व कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. मास्कचा वापर करावा, वारंवार हात स्वच्छ धुवावेत, तसेच सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी.
- डॉ.योगेश कर्डिले, प्राथमिक आरोग्य केंद्र, जेऊर
--
नागरिकांनी कोरोनाबाबत शासनाने ठरवून दिलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. विवाह सोहळा, इतर धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांमध्ये गर्दी टाळावी.
- सविता लांडे, ग्रामविकास अधिकारी, जेऊर