कोरोनाने गेले डोक्यावरचे केस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:44 IST2021-09-02T04:44:30+5:302021-09-02T04:44:30+5:30

अहमदनगर : कोरोना होऊन गेलेल्यांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. म्युकरमायकोसिस या आजारानेही काही दिवस बरे झालेल्या रुग्णांना ...

Corona's hair on her head | कोरोनाने गेले डोक्यावरचे केस

कोरोनाने गेले डोक्यावरचे केस

अहमदनगर : कोरोना होऊन गेलेल्यांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. म्युकरमायकोसिस या आजारानेही काही दिवस बरे झालेल्या रुग्णांना विळखा घातला होता. आता कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांच्या डोक्यावरचे केसही कमी होत असल्याचे दिसून येत आहेत. डोक्यावरील केस गळण्याची ही समस्या तज्ज्ञांनी केलेल्या अवलोकनातूनच समोर आली आहे.

कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना अशक्तपणा, थकवा, डोळ्यांच्या समस्या, अंगावर व्रण येणे, लाल पडणे, एलर्जी या समस्या जाणवत आहेत. त्यातच आता डोक्यावरचे केस गळण्याची समस्याही दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, कोरोना होऊन गेल्यानंतर महिनाभरातच ही समस्या दिसून येते. मोठ्या प्रमाणात घेतली जाणारी औषधे, तणाव, व्हिटॅमिनची कमतरता, ताप, अस्वच्छता, हार्मोनमध्ये होणारे बदल यामुळे समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.

--------

तीन महिन्यांनी गळतात केस

कोरोनानंतर माणसाच्या शरीरात विविध बदल जाणवू लागतात. पोषक तत्त्वाची कमतरता, वजन कमी होणे, तणाव यामुळे केस गळती होते. अनेकदा केस विंचरताना ते फरशीवर किंवा कपड्यांवर पडलेले दिसतात. स्त्रियांचे केस कंगव्यामध्ये गुंतलेले आढळतात. तीन महिन्यांनी ही समस्या तयार होते, असे तज्ज्ञ सांगतात.

-------------

हे करा....

कोरोनावर मात केल्यानंतर आहारात प्रथिने, कार्बोदके, व्हिटॅमिनचा समावेश असणाऱ्या सल्ला घेऊनच औषध उपचार करावा. हेअर प्रोडक्ट चांगल्या दर्जाचे वापरावे. शक्यतो मोठ्या कंगव्याने केस विंचरावीत. तणावातून मुक्त होण्यासाठी योगाभ्यास सुरू करावा.

------------

घरगुती उपायही कराच

केस गळती रोखण्यासाठी अनेकदा घरगुती उपाय केले जातात; मात्र त्याच्याविरुद्ध परिणामदेखील होऊ शकतात. कारण त्यातून बरे झाल्यावर सतत औषधांचा मारा सुरू असल्यामुळे शरीर अशक्त पडते. त्यातच घरगुती उपचार केल्याने समस्यांत भर पडू शकते. यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर घरगुती उपाय करावेत.

-------------

पोषण होईल, असा आहार घेणे गरजेचे आहे. रोज सकाळी तूप टाकून गायीचे दूध घ्यावे. गुळवेल पावडर, आवळा खाल्ला पाहिजे. याचा दीर्घकाळ परिणाम होईल. याशिवाय भुकेप्रमाणे आहार, वेळेवर जेवण, चांगली झोप आणि व्यायाम या गोष्टीही आवश्यक आहेत.

-डॉ. मंदार वैद्य, आयुर्वेदतज्ज्ञ.

------------

डमी क्रमांक-१११५

Web Title: Corona's hair on her head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.