अहमदनगर कॉलेजमध्ये कोरोना लसीकरण जागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:20 IST2021-05-12T04:20:48+5:302021-05-12T04:20:48+5:30

गेल्या एक ते दीड वर्षापासून कोविडचे वातावरण अतिशय गंभीर बनले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रम घेणे अवघड झाले. त्यामुळे सामाजिक ...

Corona Vaccination Awareness Campaign at Ahmednagar College | अहमदनगर कॉलेजमध्ये कोरोना लसीकरण जागृती अभियान

अहमदनगर कॉलेजमध्ये कोरोना लसीकरण जागृती अभियान

गेल्या एक ते दीड वर्षापासून कोविडचे वातावरण अतिशय गंभीर बनले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रम घेणे अवघड झाले. त्यामुळे सामाजिक माध्यमाच्या अंतर्गत सध्या कार्यक्रम घ्यावे लागत आहेत. या महामारीत मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. परिणामी ही परिस्थिती दूर करण्यासाठी लसीकरण हा महत्त्वाचा दुवा आहे, हे जागतिक पातळीवर सिद्ध झाले आहे. तसेच या कालावधीत भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने लसीकरण मोहीम हाती घेतली. तोच धागा पकडून लसीकरण जनजागृती मोहीम करावी, नवतरुणांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी, त्यांच्या या ज्वलंत प्रश्नाविषयी जनजागृती निर्माण करणे आणि त्यांना त्यातून जास्तीत जास्त लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून कोरोनाचा प्रभाव कमी होईल, या हेतूने प्रश्नमंजुषा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांचा विद्यार्थी कल्याण विभाग आणि अहमदनगर कॉलेज अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कोरोना लसीकरण जागृती अभियान हा कार्यक्रम गुगल फोमच्या सहाय्याने ऑनलाईन माध्यमातून घेण्यात आला. या स्पर्धेत चार विद्यापीठातील (मुंबई विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे व छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ कोल्हापूर) सतरा महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला, तर ११७ स्पर्धकांनी भाग घेतला होता.

या स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांची व विद्यार्थी कल्याण मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संचालक डॉ. संतोष परचुरे यांची प्रेरणा होती.

या कार्यक्रमासाठी प्रीतमकुमार बेदरकर यांचे सहकार्य लाभले तर कार्यक्रमासाठी विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी डॉ. भागवत परकाळ यांनी परिश्रम घेतले.

-----------------

Web Title: Corona Vaccination Awareness Campaign at Ahmednagar College