राजापूर येथे १४४ नागरिकांचे कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:20 IST2021-04-22T04:20:45+5:302021-04-22T04:20:45+5:30
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथे बेलवंडी व राजापूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून कोरोना लसीकरणास प्रारंभ होऊन १४४ नागरिकांचे ...

राजापूर येथे १४४ नागरिकांचे कोरोना लसीकरण
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथे बेलवंडी व राजापूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून कोरोना लसीकरणास प्रारंभ होऊन १४४ नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले.
ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ४५ वर्षे वयाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण सरपंच प्रतीक्षा धनंजय मेंगवडे, उद्योजक अतुल लोखंडे, ग्रा.पं. सदस्य शंकर पाडळे, अशोक वाखारे, अनिल गव्हाणे, धनंजय मेंगवडे यांच्या उपस्थितीत झाले.
गंगाराम धावडे या ज्येष्ठ नागरिकांनी पहिली लस घेतली. आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना लसीकरणाबाबत तसेच लसीकरणानंतर कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. सचिन जगताप, डॉ. पूजा लोखंडे, आरोग्य सेविका सविता रणदिवे, संतोष पवार, दादा पवार, मंगल लोखंडे, नूरजहाँ सय्यद यांनी लसीकरण प्रक्रियेत सहभाग घेतला.