जेऊर कुंभारी उपकेंद्रामध्ये व्यावसायिकांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:22 IST2021-05-27T04:22:01+5:302021-05-27T04:22:01+5:30
ग्रामपंचायत जेऊर कुंभारी व आरोग्य विभागाच्या वतीने गावातील प्रत्येक दुकानदारांची वैद्यकीय पथकांकडून कोरोना रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये ...

जेऊर कुंभारी उपकेंद्रामध्ये व्यावसायिकांची कोरोना चाचणी
ग्रामपंचायत जेऊर कुंभारी व आरोग्य विभागाच्या वतीने गावातील प्रत्येक दुकानदारांची वैद्यकीय पथकांकडून कोरोना रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये ५३ चाचणी करण्यात आल्या असून सर्व निगेटिव्ह रिपोर्ट आले असल्याची माहिती आगवन यांनी दिली आहे. वैद्यकीय अधिकारी आगवन, आशा सेविका, संगीता गायकवाड, उपसरपंच जालिंदर चव्हाण, संजय भोंगळे, संजय वक्ते, ग्रामसेवक कैलास रणछोड यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला .
कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा धोका मागच्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढत होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह प्रशासन कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मेहनत घेत आहे. आरोग्य कर्मचारी, आशा सेविका व अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन चौकशी करण्यासह आजारी रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जेऊर कुंभारी उप केंद्राच्या समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्व सहकारी संक्रमण थोपविण्यासाठी परिश्रम घेत आहे. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णसंख्येतील वाढ कमी करण्यासाठी गावातील भाजी विक्रेते, व्यावसायिक, सर्व प्रकारचे कर्मचारी व कामगार यांची ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना तपासणी घेण्यात आली.