परवानगी असलेल्या दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:21 IST2021-05-23T04:21:30+5:302021-05-23T04:21:30+5:30
सर्व दक्षता पथक आणि प्रभाग समिती कार्यालय आपल्या प्रभागातील ज्या आस्थापनांना परवानगी आहे, त्या आस्थापनांची तपासणी करणार असून ज्यांच्याकडे ...

परवानगी असलेल्या दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक
सर्व दक्षता पथक आणि प्रभाग समिती कार्यालय आपल्या प्रभागातील ज्या आस्थापनांना परवानगी आहे, त्या आस्थापनांची तपासणी करणार असून ज्यांच्याकडे चाचणी रिपोर्ट नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असे आयुक्त गोरे यांनी सांगितले आहे.
प्रत्येक अस्थापनातील प्रत्येक दुकानदार आणि त्यांचे कर्मचारी यांची चाचणी बंधनकारक असून, नजीकच्या अहमदनगर महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात त्यांनी विनामूल्य चाचणी करून तसा रिपोर्ट जवळ बाळगायचा आहे. २५ मेनंतर ज्या आस्थापनाकडे रिपोर्ट नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असे उपायुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले आहे.
आरटीपीसीआर चाचणीसंदर्भात अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त संतोष लांडगे यांच्याशी संपर्क साधावा, असे महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. चौकाचौकात तसेच संपूर्ण प्रभागात परवानगी नसताना भाजीपाला विक्रेते, फळे विक्रेते आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार असून, त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. नागरिकांना एकमेकांचा संसर्ग होऊ नये यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये हा हेतू आहे, असे संतोष लांडगे, दक्षता पथक प्रमुख शशिकांत नजान यांनी संगितले.