खारेकर्जुने गावात ६५ जणांची कोरोना टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:21 IST2021-04-23T04:21:35+5:302021-04-23T04:21:35+5:30

ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, गावातील दुकानदार व तरुण मंडळी यांनी देखील आपली टेस्ट केली अशी माहिती उपसरपंच अंकुश शेळके यांनी ...

Corona test of 65 people in Kharekarjun village | खारेकर्जुने गावात ६५ जणांची कोरोना टेस्ट

खारेकर्जुने गावात ६५ जणांची कोरोना टेस्ट

ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, गावातील दुकानदार व तरुण मंडळी यांनी देखील आपली टेस्ट केली अशी माहिती उपसरपंच अंकुश शेळके यांनी दिली.

सध्या ग्रामीण भागातही कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे ग्रामस्थांची गैरसोय, दवाखान्यात बेड मिळणे, इंजेक्शन, ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने खारेकर्जुने या ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्यात यावे, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर व जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, माजी सभापती रावसाहेब शेळके यांच्याकडे असल्याचे उपसरपंच अंकुश शेळके यांनी सांगितले. खारेकर्जुने येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओस्वाल साहेब, गटविकास अधिकारी सुनील घाडगे, विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी गावांमध्ये भेट देऊन कोरोना संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्या व सर्व उपाययोजनांची माहिती घेतली. गावांमध्ये जास्तीत जास्त कोरोना तपासणी करून कोरोनाची साखळी कशी मोडता येईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे व त्याप्रमाणे ग्रामपंचायतीने सक्षमपणे काम करावे अशा सूचना दिल्या व मार्गदर्शन केले.

Web Title: Corona test of 65 people in Kharekarjun village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.