कोरोनाच्या रुग्णांचा रुग्णालयातच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:21 IST2021-04-22T04:21:49+5:302021-04-22T04:21:49+5:30

अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयांत एकही बेड शिल्लक नाही. प्रशासनाने सर्व कोविड सेंटर व हॉस्पिटल मिळून सोळा हजार ...

Corona patients died at the hospital | कोरोनाच्या रुग्णांचा रुग्णालयातच मृत्यू

कोरोनाच्या रुग्णांचा रुग्णालयातच मृत्यू

अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयांत एकही बेड शिल्लक नाही. प्रशासनाने सर्व कोविड सेंटर व हॉस्पिटल मिळून सोळा हजार बेडची तयारी केली आहे. मात्र, रोज तीन हजार जण कोरोनाबाधित होत असून, सक्रिय रुग्णांची संख्या २१ हजारांच्या वर गेली आहे. त्यामुळे १२ हजारांच्या वर रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. सर्व गंभीर रुग्णांना शासकीय अथवा खासगी रुग्णालयातच दाखल केले जात असून, तिथेच त्यांचा मृत्यू झाला आहे. गृहविलगीकरणात मृत्यू झालेल्यांची संख्या जिल्ह्यात नगण्य आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, ६० ते ७० टक्के रुग्ण अजूनही गृहविलगीकरणातच राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात कुटुंब, समाजातील अवतीभोवतीचे लोक संपर्कात येत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात ज्येष्ठ नागरिक, विविध आजार असलेले त्यांच्यापासून बाधित होत आहेत. ते गंभीर असलेल्या रुग्णांना उपचार करेपर्यंत अनेक समस्या तयार होतात. त्यामुळे त्यांचे मृत्यू होत असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले.

---

एकूण रुग्ण -१,४५,२७०

बरे झालेले रुग्ण -१,२१,६२५

सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण - २१,९८९

गृहविलगीकरणातील रुग्ण -१२ हजार

----------

२) १०० टक्के मृत्यू रुग्णालयात

गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण पाचशे जणांचा बळी गेला आहे. फेब्रुवारीमध्ये ४८, मार्चमध्ये १२२, तर १७ एप्रिलपर्यंत १७०, असे मृत्यू झाले आहेत. त्यानंतर पोर्टलवर १०२ जणांचा मृत्यू दाखविण्यात आला. त्यामुळे तीन महिन्यांत तब्बल पाचशे जणांचा मृत्यू झाला आहे. एप्रिलमध्ये रोज ४० जणांवर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

--------

कारणे काय ?

कोरोना चाचणीचा अहवाल येण्यास विलंब

अहवाल येईपर्यंत रुग्णांचा संपर्क वाढतो

गृहविलगीकरणामुळे कुटुंब, समाज बाधित

गृहविलगीकरणात त्रास झाल्यानंतर रुग्णालयात दाखल

रेमडेसिविर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसाठी धावाधाव

उपचारास झालेल्या विलंबाने मृत्यू संख्येत वाढ

इतर आजारांमुळे उपचारात अडथळे

-------

डमी

नेट फोटो

डेथ

कोरोना

१९ कोरोना डेथ इन होम डमी

Web Title: Corona patients died at the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.