नगर तालुक्यातही आढळला कोरोनाचा रुग्ण; मुंबईतून आला होता पळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 11:53 IST2020-05-25T11:52:02+5:302020-05-25T11:53:01+5:30

नगर तालुक्यातील वाकोडी येथे एक ४१ वर्षाचा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. हा तरुण मुंबई येथून वाट चुकवत १८ तारखेला पळून आला होता.

Corona patient also found in Nagar taluka; He had fled from Mumbai | नगर तालुक्यातही आढळला कोरोनाचा रुग्ण; मुंबईतून आला होता पळून

नगर तालुक्यातही आढळला कोरोनाचा रुग्ण; मुंबईतून आला होता पळून

अहमदनगर : नगर तालुक्यातील वाकोडी येथे एक ४१ वर्षाचा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. हा तरुण मुंबई येथून वाट चुकवत १८ तारखेला पळून आला होता.
नगर तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आहे. परंतु सोमवारी नगर तालुक्यातील वाकोडी येथे एका ४१ वर्षाला तरुणाला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. सदर रुग्ण १८ रोजी मुंबईहून वाट चुकवत  गावात आला होता. परंतु त्याला दोन दिवसापूर्वी सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्यास नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.
सोमवारी  या तरुणाचा अहवाल रुग्णालय प्रशासनाला पॉझिटिव्ह आढळून आला आहे, अशी माहिती नगर तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे यांनी दिली.
दरम्यान, वाकोडी येथील तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढल्याने प्रशासनाने त्याची तातडीने दखल घेतली आहे. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध प्रशासनामार्फत सुरू आहे. त्यादृष्टीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. ग्रामस्थांनीही त्यास सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे केले आहे.  

Web Title: Corona patient also found in Nagar taluka; He had fled from Mumbai