शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना प्रादूर्भाव : राहाता तालुक्यातील २५ जणांची तपासणी; तबलीक जमातीच्या आले होते संपर्कात; पाच गावात केले लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 10:05 IST

इंडोनेशिया येथील तबलीक जमातीमध्ये दोन दिवस वास्तव्यास आसलेला व्यक्ती कोरोना पॉझीटिव्ह निघाली  होती. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या राहाता तालुक्यातील पाच गावातील २५ जणांना  खबरदारी म्हणून शुक्रवारी रात्री कोरोना तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे.

लोणी : इंडोनेशिया येथील तबलीक जमातीमध्ये दोन दिवस वास्तव्यास आसलेला व्यक्ती कोरोना पॉझीटिव्ह निघाली  होती. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या राहाता तालुक्यातील पाच गावातील २५ जणांना  खबरदारी म्हणून शुक्रवारी रात्री कोरोना तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे.   जिल्हा नियंत्रण कक्षाच्या सूत्रांनूसार खबरदारी म्हणून या २५ जणांची  तपासणी करण्यात येणार आहे. प्राप्त माहितीनुसार इंडोनेशिया येथून तबलीक जमातीमध्ये  दोन दिवस वास्तव्य करून आलेल्या या व्यक्तीला  अहमदनगर शहरातील मुकूंदनगर भागातून ताब्यात घेतल्यानंतर तो कोरोना पॉझीटिव्ह असल्याचे सिध्द  झाले. चौकशी दरम्यान संबंधीत व्यक्ती ही १० ते २० मार्च या कालावधीत राहाता तालुक्यातील लोणी बुद्रूक येथील ३, कोल्हार येथील ७, दाढ येथील ५, पाथरे येथील ४, हसनापूर येथील ७ याप्रमाणे या  पाच गावातील २५ जणांच्या संपर्कात आली असल्याचे समोर आले. यावर आरोग्य विभागाने तात्काळ या २५ जणांचा तपास करीत  शुक्रवारी या २५ जणांना  कोरोना तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठविले.     अवघ्या २६-२७ किलोमीटर अंतरावर असलेल्या संगमनेर येथे कोरोना बाधित रूग्ण असल्याचे समोर आले आहे. आता त्यातच इंडोनेशिया येथून तबलीक जमातीमध्ये दोन दिवस वास्तव्य करून आलेला व्यक्ती  कोरोना पॉझीटिव्ह निघाल्याने या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या  लोणी बुद्रूक, कोल्हार, दाढ, पाथरे, हसनापूर  या पाच गावातील २५ जणांना  कोरोना तपासणीसाठी अहमदनगर येथे नेल्याने येथील नागरिकांमध्ये  धास्ती वाढली आहे. पाच गावांमध्ये तीन लॉकडाऊनचा निर्णयराहाता तालुक्यातील पाच गावांमध्ये कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारपासून (दि.४ एप्रिल) मेडीकल सेवा वगळता संपूर्ण लॉकडाऊन घेण्याचा निर्णय झाला आहे. किराणा दुकानदार, टपरीचालक, फळ, भाजीपाला विक्रेते मॉलचा यात सहभाग असणार आहे. तर राष्ट्रीयकृत, सहकारी बँकेच्या शाखा आणि पतसंस्था यांनीही या लॉकडाऊनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनातर्फे केले आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahatniरहाटणीcorona virusकोरोना वायरस बातम्या