नगर शहरातील दाळ मंडई, तोफखाना भागात प्रत्येकी पाच बाधित रुग्ण, पाईपलाईन रोडवर कोरोनाने खाते उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 18:55 IST2020-06-28T18:55:18+5:302020-06-28T18:55:26+5:30
अहमदनगर- रविवारी सायंकाळी जिल्ह्यात १३ जण वाढले. त्यामुळे एकाच दिवसात पुन्हा २५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. या तेरांमध्ये नगर शहरातील १२, तर एक भिंगार शहरातील आहे.

नगर शहरातील दाळ मंडई, तोफखाना भागात प्रत्येकी पाच बाधित रुग्ण, पाईपलाईन रोडवर कोरोनाने खाते उघडले
अहमदनगर- रविवारी सायंकाळी जिल्ह्यात १३ जण वाढले. त्यामुळे एकाच दिवसात पुन्हा २५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. या तेरांमध्ये नगर शहरातील १२, तर एक भिंगार शहरातील आहे.
आज सायंकाळी एकूण १३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नगर शहरातील तोफखाना भागातील ०५, ढवण वस्ती येथील एक, पाइप लाइन पद्मा नगर येथील एक, आडते बाजार येथील ०५ आणि भिंगार येथील एक रुग्ण बाधित आढळून आले आहे.
*आज सकाळी १२ व्यक्ती बाधित आढळून आल्या होत्या. दिवसभरात एकूण २५ बाधित रुग्ण आढळून आले.
पाईपलाईन रोडवर कोरोनाने प्रथमच खाते उघडले आहे. पाईपलाईन रोडवर दोन जण बाधित आहेत. त्यामध्ये एक भिस्तबाग नाका आणि दुसरा यशोदानगर समोरील पद्मानगरमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे.