गुंडेगावात कोरोना तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST2021-06-20T04:15:35+5:302021-06-20T04:15:35+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील गुंडेगाव कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असताना काही प्रमाणात रुग्ण आढळून आल्यानंतर गावात रॅपिड अँटिजन तपासणीचे शिबिर ...

गुंडेगावात कोरोना तपासणी शिबिर
केडगाव : नगर तालुक्यातील गुंडेगाव कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असताना काही प्रमाणात रुग्ण आढळून आल्यानंतर गावात रॅपिड अँटिजन तपासणीचे शिबिर घेण्यात आले. वाळकी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर घेण्यात आले. गावातील व परिसरातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंतच्या लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली. यावेळी आरटीपीसार चाचणीही करण्यात आली. यामध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही. पुढील काळात गुंडेगाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे गुंडेगाव उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली चव्हाण यांनी सांगितले. यावेळी आरोग्य सेवक डॉ. विलास दाताळ, टेक्निशिअन विकास पिंपरकर, जगताप, महादेव माने महाराज, युवा उद्योजक संतोष कोतकर, सतीश चौधरी, गोरख माने, संजय भापकर यांनी तपासणी मोहिमेसाठी परिश्रम घेतले.