नगर जिल्ह्यात आणखी सहा जणांना कोरोनाची लागण; नगरचा आकडा पोहोचला चौदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 13:58 IST2020-04-02T13:57:43+5:302020-04-02T13:58:23+5:30
कोरोनाबाधितांचा आकडा अहमदनगरमध्ये वाढतच चालला आहे. आज गुरुवारी आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अहमदनगरचा आकडा आता १४ वर पोहोचला आहे.

नगर जिल्ह्यात आणखी सहा जणांना कोरोनाची लागण; नगरचा आकडा पोहोचला चौदावर
अहमदनगर : कोरोनाबाधितांचा आकडा अहमदनगरमध्ये वाढतच चालला आहे. आज गुरुवारी आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे अहमदनगरचा आकडा आता १४ वर पोहोचला आहे.
गुरुवारी (दि.२ एप्रिल) दुपारी ५१ जणांचा अहवाल पुण्याच्या एनआयव्हीकडून प्राप्त झाला. त्यात सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आणखी साठ ते सत्तर अहवाल येणे बाकी आहे. एकाच दिवशी सहा आकडा वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेण्याची गरज असून नागरिकांनी बाहेर पडू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत.
दरम्यान यात दोन परदेशी, दोन नगर शहरातील मुकुंदनगर आणि दोन संगमनेर येथील नागरिकांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.