कोरोनाने हिरवले ३४ मुलांचे आई-बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:22 IST2021-05-27T04:22:05+5:302021-05-27T04:22:05+5:30

आई अथवा वडिलांचा मृत्यू झालेले बालके हे नगर शहरासह श्रीगोंदा, पारनेर, राहता व पाथर्डी तालुक्यातील आहेत. कोरोना संसर्गामुळे ज्या ...

Corona green 34 parents of children | कोरोनाने हिरवले ३४ मुलांचे आई-बाबा

कोरोनाने हिरवले ३४ मुलांचे आई-बाबा

आई अथवा वडिलांचा मृत्यू झालेले बालके हे नगर शहरासह श्रीगोंदा, पारनेर, राहता व पाथर्डी तालुक्यातील आहेत. कोरोना संसर्गामुळे ज्या बालकांनी आपले पालक गमावले आहेत त्यांना संरक्षण मिळावे तसेच ही बालके शोषणास बळी पडू नयेत, तस्करीत ओढले जाऊ नयेत यासाठी शासन आदेशाप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निराधार बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी १७ मे रोजी टास्क फोर्स गठित करण्यात आली आहे. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख हे टास्क फोर्सचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. गेल्या दहा दिवसात टास्क फोर्सकडे ० ते १८ वयोगटातील ३४ बालकांची माहिती प्राप्त झाली आहे. यामध्ये पूर्णतः निराधार झालेल्या बालकांचे महिला व बालकल्याण समिती अंतर्गत असलेल्या बालगृहात संगोपन केले जाणार आहे. तसेच ज्या बालकांचा कमावता पालक आई किंवा वडील यांचा मृत्यू झाला आहे त्यांना बालसंगोपन योजनेअंतर्गत आर्थिक साहाय्य केले जाणार आहे.

........

निराधार बालकांची माहिती

पाठविण्याचे आवाहन

कोरोनामुळे ज्या बालकांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे अथवा ज्या बालकांची काळजी घेण्यास कोणीही नाही अशा बालकांच्या संदर्भात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख यांच्या ९९२१११२९११ व बालकल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख यांच्या ९०११०२०१७७ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

..........

‘त्या’ बालकांनाही मिळणार निवारा

ज्या बालकांचे आई-वडील कोरोना संसर्गामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत व त्यांच्या बालकांना सांभाळण्यास कोणी नाही, अशा बालकांनाही महिला व बालकल्याण विभागामार्फत निवारा दिला जाणार आहे.

........

जुळ्या मुलांची बालगृहात व्यवस्था

नगर शहर परिसरातील जुळ्या मुलांच्या मातेचे कोरोनामुळे निधन झाले. त्या मुलांचे संगोपन करणे वडिलांनाही शक्य नसल्याने या मुलांची टास्क फोर्समार्फत ढवळपुरी येथील बालगृहात व्यवस्था करण्यात आली आहे.

............

कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झालेल्या बालकांच्या संगोपनाची जबाबदारी महिला व बाल विकास विभागामार्फत घेतली जात आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे. अशा निराधार बालकांबाबत जनतेने माहिती कळवावी. अशा बालकांना गरजेप्रमाणे तत्काळ निवारा व बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे.

-वैभव देशमुख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी

..........

डमी आहे

Web Title: Corona green 34 parents of children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.