अनेकांना कोरोना भयमुक्त केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST2021-07-11T04:16:16+5:302021-07-11T04:16:16+5:30
जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष मनोजकुमार नवले यांनी दोन वर्षांपासून निःस्वार्थीपणाने व कुठलाही गाजावाजा न करता प्रसिद्धी न करता कोरोना ...

अनेकांना कोरोना भयमुक्त केले
जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष मनोजकुमार नवले यांनी दोन वर्षांपासून निःस्वार्थीपणाने व कुठलाही गाजावाजा न करता प्रसिद्धी न करता कोरोना महामारीत पडद्यामागून एक मोठे कार्य केल्याबद्दल त्यांचा अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे व नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या हस्ते इंजिनिअर चंद्रकांत परदेशी यांच्या कार्यालयात सत्कार केला. यावेळी जिल्हा पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार मनोज आगे यांचाही सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीसप्रमुख अखिलेशकुमार सिंह, अपर जिल्हाधिकारी संदीप निचित, अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, मीडिया क्षेत्रातील अशोक गाडेकर, रमेश कोठारी, अशोक तुपे, शिवाजी पवार, महेश माळे, मनोज आगे, जयेश सावंत, अमोल कदम, पद्माकर शिंपी, सुनील नवले, करण नवले या मान्यवरांना कोरोना महामारीत समाजामध्ये जनजागृती करून समाजप्रबोधन केल्यामुळे कोरोनायोद्धा पुरस्कार देऊन सन्मानित केले. तसेच आरोग्य, पोलीस, महसूल अनेक क्षेत्रातील एकूण १४८ जणांना पुरस्कार देण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आर्किटेक्ट के. के. आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था समाजकार्य करत आहे.
चंद्रकांत परदेशी, कुणाल करंडे, सुनील साठे, सोमनाथ महाले, सूर्यकांत सगम, सोमनार परदेशी, सुदर्शन निकाळे, अनिल छाबडा, प्रवीण गुलाटी, सुनील शेळके, दीपक कदम, प्रमोद पत्की, प्रदीप आहेर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक लुकस दिवे यांनी केले. आभारप्रदर्शन कुणाल करंडे यांनी केले.