कोरोनामुळे सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:19 IST2021-01-17T04:19:04+5:302021-01-17T04:19:04+5:30
तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोकुळ घोगरे म्हणाले, की पहिल्या टप्प्यातील या लसीकरणात आरोग्य कर्मचारी, पोलीस अधिकारी-कर्मचारी, सफाई कामगार, आदींना ...

कोरोनामुळे सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले
तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोकुळ घोगरे म्हणाले, की पहिल्या टप्प्यातील या लसीकरणात आरोग्य कर्मचारी, पोलीस अधिकारी-कर्मचारी, सफाई कामगार, आदींना ही लस दिली जाणार आहे. सुरुवातीला ३०० डोस प्राप्त झाले आहे. शनिवारी आमच्या आरोग्य विभागामध्ये डॉक्टर म्हणून काम करणारे डॉ. श्रीपाद मैड यांना पहिली लस देण्यात आली. आज लस दिल्यानंतर दुसरा डोस चार आठवड्यांनी देण्यात येणार आहे. लस दिल्यानंतर प्रतीक्षालयामध्ये अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवले होते. लाभार्थ्याला लस घेणे हे सक्तीचे नसून, लसीकरण केंद्रावर आल्यानंतर त्याच्या शरीराचे तापमान तपासले जाणार आहे. त्यानंतर त्याची ओळख घेतली जाईल. लस देण्याची माहिती दिली जाईल. त्यानंतर इंजेक्शनद्वारे लाभार्थ्याला लस दिली जाईल. जरी लस घेतली तरी सरकारने घालून दिलेले नियम सोशल डिस्टंसिंग, मास्क लावणे, हात साबणाने धुणे, इत्यादी गोष्टी आपल्याला काही दिवस कराव्या लागणार आहेत.
याप्रसंगी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तहसीलदार कुंदन हिरे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, संस्थांचे आरोग्याधिकारी डॉ. विजय नरोडे, डॉ. प्रीतम वडगावे, डॉ. स्वाती म्हस्के उपस्थित होते.
(१६ राहाता लसीकरण)