अकोलेतील आदिवासी भागातील कोरोना हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:23+5:302021-06-21T04:15:23+5:30
अकोले तालुक्यातील दक्षिण विभागातील कोतूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ गावे, कोहणे केंद्रात २३ गावे तर ब्राम्हणवाड्यात १४ अशी ५५ ...

अकोलेतील आदिवासी भागातील कोरोना हद्दपार
अकोले तालुक्यातील दक्षिण विभागातील कोतूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ गावे, कोहणे केंद्रात २३ गावे तर ब्राम्हणवाड्यात १४ अशी ५५ गावे आहेत. गेल्या दहा दिवसांत (१० ते १८ जून) या कालावधीत कोतुळात १३५९ कोविड चाचण्या झाल्या. त्यात ११ सौम्य रुग्ण आढळले. कोहणेत ६०० तपासणीत शून्य रुग्ण आढळले. मवेशी केंद्रात १९ गावात ५५० तपासण्यात दहा दिवसात एक रुग्ण तर शेंडीत १७ गावात ८६४ तपासणीत केवळ एक रुग्ण सापडला. शेंडी, मेवेशीतले दोन्ही रुग्ण शहराशी संबंधित आहेत तर ब्राम्हणवाड्यात १२०७ चाचण्यांत ६२ रुग्ण आढळल्याने ब्राम्हणवाड्याची स्थिती आटोक्यात आणणे गरजेचे ब्राम्हणवाडा हे बिगर आदिवासी क्षेत्रात येते.
गेल्या पाच दिवसांत कोतुळ केंद्रातील १८ गावे व कोहणे केंद्रातील २३ मवेशीच्या, १९ गावात एकही रुग्ण न आढळल्याने मुळा नदीच्या काठावरील गावांतील कोरोनो हद्दपार झाला असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यापासून आदिवासी भागातील लोक शेती कामात व्यस्त असल्याने गाव सोडत नाहीत, कदाचित संपर्क तुटल्यामुळे रुग्ण संख्या घटली आहे. काळजी घेतल्यास लवकर जिल्ह्यात महिन्यापूर्वी तीव्र असलेला अकोले कोरोनामुक्त होईल.
.....................
अकोले तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अत्यंत दुर्गम आदिवासी भागात चांगली कामगिरी केली. बाहेरच्या लोकांचा संपर्क टाळला व योग्य काळजी घेतली तर अकोले तालुका लवकरच कोरोनामुक्त होईल. जर थोडीशी लक्षणे किंवा संशय आला तर तातडीने तपासणी करून घ्या.
- डाॅ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी,