नगर जिल्ह्यात कोरोना हरतोय, ५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 18:50 IST2020-04-12T18:50:16+5:302020-04-12T18:50:28+5:30
अहमदनगर : जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी ५९ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यात, सजेर्पुरा(नगर) येथील २३, पाथर्डी तालुक्यातील १५, कोपरगाव येथील १४ व्यक्तीचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली

नगर जिल्ह्यात कोरोना हरतोय, ५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह
अहमदनगर : जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी ५९ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यात, सजेर्पुरा(नगर) येथील २३, पाथर्डी तालुक्यातील १५, कोपरगाव येथील १४ व्यक्तीचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली सर्वच्या सर्व अहवाल निगेटिव्ह येत असल्याने खंबीर प्रशासन आणि गंभीर जनता कोरोनाला पराभूत करेल, अशी आशा पल्लवीत झाली आहे.
कोपरगाव येथील बाधित आढळलेल्या महिलेच्या संपकार्तील व्यक्तींचे स्त्राव नमुने शनिवारी पाठविण्यात आले होते. त्याशिवाय, पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील काही व्यक्तींचे स्त्राव नमुनेही पाठविण्यात आले होते. या नमुन्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. निगेटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये राहुरी येथील ०३ आणि अकोले येथील एका व्यक्तीच्या अहवालाचा समावेश आहे.
अहमदनगरमध्ये आतापर्यंत २७ जण कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी श्रीरामपूर येथील एकाचा मृत्यू झाला आहे. तोही पुणे येथील एकाच्या संपर्कात होता. तीन जण बरे होऊन घरी गेले आहेत. आठ परदेशी व परप्रांतीय आहेत. तसेच इतर कोरोनाबाधितांची प्रकृती सुधारत आहे. दोन- तीन दिवसात एकही पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. त्यामुळे नगर जिल्ह्यात कोरोनाचा पराभव होत असल्याचे दिसते. लॉकडाऊनमध्ये लोकांकडून पाळले जाणारे नियम, प्रशासनाकडून कडक कारवाई व उपाययोजनांमुळे नगरमधील लोकांचे अहवाल निगेटिव्ह येत असल्याचे स्पष्ट होत आहे.