संतलुक रुग्णालयात कोरोना केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:18 IST2021-04-19T04:18:30+5:302021-04-19T04:18:30+5:30
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सरकारी तसेच सर्व खासगी रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे शहरात तातडीने चार ते पाच खासगी ...

संतलुक रुग्णालयात कोरोना केंद्र सुरू
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सरकारी तसेच सर्व खासगी रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे शहरात तातडीने चार ते पाच खासगी रुग्णालयांना उपचाराकरिता मान्यता देण्यात आली. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे, असे कानडे यांनी सांगितले.
गेल्यावर्षी संतलुक रुग्णालय येथे कोरोना केंद्र उघडण्यात आले होते; मात्र दुसऱ्या लाटेमध्ये सेवा देण्यास तेथील व्यवस्थापन राजी नव्हते. त्यामुळे शनिवारी पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर नव्याने व्यवस्थापनाशी चर्चा केली. अडचणीच्या काळात नागरिकांवर उपचार करण्याची त्यांना विनंती केली. त्यास सिस्टर फिलो, सिस्टर डार्ली यांनी मान्यता दिली.
त्यामुळे येथे शंभर बेड्सचे उच्च दर्जाचे कोरोना उपचार केंद्र सुरू झाले आहे. त्यात ऑक्सिजनची व्यवस्था आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकरिता येथे सुरेश ठुबे यांना शिवभोजन केंद्र चालविण्यास देण्यात आले आहे. त्यामुळे मोफत थाळीचा लाभ घेता येणार आहे. शहरवासीयांना कोरोनातून दिलासा देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती कानडे यांनी दिली.
--------