राहुरी विद्यापीठाचे कोरोना सेंटर बनले गैरसोयीचे आगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:21 IST2021-03-10T04:21:00+5:302021-03-10T04:21:00+5:30
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये शासनाने कोरोना सेंटर सुरू केले आहे. या सेंटरमध्ये २२ रुग्ण आहेत. कोरोना सेंटरमध्ये ...

राहुरी विद्यापीठाचे कोरोना सेंटर बनले गैरसोयीचे आगार
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये शासनाने कोरोना सेंटर सुरू केले आहे. या सेंटरमध्ये २२ रुग्ण आहेत. कोरोना सेंटरमध्ये असलेल्या खोल्यांमध्ये स्वच्छता करण्यासाठी झाडू उपलब्ध नाही. त्यामुळे स्वच्छता करायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णांना स्वच्छता करावी लागते. पाणी पिण्याची व्यवस्था याठिकाणी नाही. त्यामुळे रुग्णांना घरूनच पाणी आणावे लागते. टॉयलेट ही स्वतःलाच स्वच्छ करावे लागते. डॉक्टर दिवसातून एकदाच व्हिजिट देतात. सॅनिटायझरची देखील सुविधा उपलब्ध नाही. मास्क ही उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत कोरोना सेंटरचे काम सुरू आहे.
कोरोना सेंटरकडे रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोनाची संख्या घटली होती. त्यामुळे सेंटरमध्ये शुकशुकाट होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना सेंटरमध्ये सुविधा नसल्याची तक्रार रुग्णांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र,कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही.
............
कोरोना सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे स्वच्छता करायची कशी हा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छतेसाठी झाडू नाही. पिण्यासाठी पाणी नाही. जेवण घरुनच आणावे लागते. टॉयलेटमध्ये स्वच्छता रुग्णानाच करावी लागते. सॅनिटायझर देखील उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत कोरोनाग्रस्त मुठीत जीव धरून दिवस व्यतीत करत आहे.
- ओमकार देशपांडे
.......................
कोरोना सेंटरचे कामकाज आपण विद्यापीठाकडे सोपविले आहे. जेवण प्रशासनाने चालू केलेले नाही. उद्यापासून जेवण चालू करणार आहोत.
- डॉ दीपाली गायकवाड,
तालुका वैद्यकीय अधिकारी, राहुरी