शिक्षकांनीच पुरवली विद्यार्थ्यांना कॉपी
By Admin | Updated: March 2, 2017 14:43 IST2017-03-02T14:43:49+5:302017-03-02T14:43:49+5:30
पाथर्डी शहरातील एका परीक्षा केंद्रावर दोन शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना कॉपी पुरविल्या असून, महाविद्यालय प्रशासनाच्या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

शिक्षकांनीच पुरवली विद्यार्थ्यांना कॉपी
ऑनलाइन लोकमत
पाथर्डी (अहमदनगर), दि. 2- पाथर्डी शहरातील एका परीक्षा केंद्रावर दोन शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना कॉपी पुरविल्या असून, महाविद्यालय प्रशासनाच्या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या शिक्षकांनी महाविद्यालयात मोठा गोंधळही घातला. पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मात्र या शिक्षकांनी माफिनामा मागत स्वत:ची सुटका करुन घेतली़. याबाबत पोलिसांनी कोणताही गुन्हा नोंदविला नसून, महाविद्यालयाच्या नोटीस बजावल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल न करताच शिक्षकांना सोडून दिल्याची चर्चा पाथर्डीतील शैक्षणिक वर्तुळात रंगली आहे़