समन्वयाने बिजोत्पादन कार्यक्रम यशस्वी करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:17 IST2021-01-15T04:17:32+5:302021-01-15T04:17:32+5:30
जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अहमदनगर, विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी, अहमदनगर, कृषि विभाग, अहमदनगर आणि महात्मा फुले कृषि ...

समन्वयाने बिजोत्पादन कार्यक्रम यशस्वी करावा
जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अहमदनगर, विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी, अहमदनगर, कृषि विभाग, अहमदनगर आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी शास्त्रज्ञ मंच सभासद यांचे शेतावर उन्हाळी सोयाबिन बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यासंबंधी ऑनलाईन बैठक मंगळवारी पार पडली. अध्यक्षस्थानावरुन डॉ. शरद गडाख बोलत होते.
याप्रसंगी बियाणे महामंडळ अहमदनगरचे जिल्हा व्यवस्थापक आर. सी. जोशी, विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी फिलीप डिसोजा, कृषि उपसंचालक विलास नलगे, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक प्रा. एम.एम. देसाई, सोयाबीन पैदासकार मिलिंद देशमुख उपस्थित होते.
यावेळी प्रा. एम.एम. देसाई यांनी स्वागत केले.
आर.सी. जोशी म्हणाले, उन्हाळी हंगामामध्ये सोयाबीन बिजोत्पादन घेण्यासाठी कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मिळाले तर चांगल्या दर्जाचे उत्पन्न मिळणे सहज शक्य आहे. उन्हाळी हंगामामध्ये सोयाबीनचे बिजोत्पादन घेतल्यास बाजारातील सध्याच्या दरापेक्षा २५ टक्के वाढीव दराने सायाबीन खरेदी करण्यात यईल. याचबरोबर १० टक्के बोनस देण्याचे प्रस्तावित आहे. महाबीज उन्हाळी हंगामासाठी चांगल्या प्रकारचे बियाणे उपलब्ध करुन देईल.