आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:19 IST2021-05-01T04:19:07+5:302021-05-01T04:19:07+5:30
तळेगाव दिघे येथील ग्रामपंचायत सभागृहात कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच बाबासाहेब कांदळकर, ...

आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे
तळेगाव दिघे येथील ग्रामपंचायत सभागृहात कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच बाबासाहेब कांदळकर, छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे, प्राचार्य एच. आर. दिघे, गणेश बोऱ्हाडे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब आंबरे, तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नयन इंगळे, रमेश झरेकर, सिंधू मुन्तोंडे, रंजना डघळे, रामेश्वर कांदळकर, पोलीस पाटील देविदास कांदळकर, गणेश बोखारे, गोकुळ दिघे उपस्थित होते.
या बैठकीत तळेगाव दिघे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या कोरोना रुग्ण स्थिती व उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक प्रमाणात औषधांचा पुरवठा करावा, अशी अपेक्षा वैद्यकीय अधिकारी डॉ. नयन इंगळे व आरोग्य कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. त्यावर थोरात साखर कारखान्यामार्फत कोरोना रॅपिड अँटिजन टेस्टसाठी आवश्यक किट उपलब्ध करून देऊ, असे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी सांगितले, तर औषधांच्या पुरवठ्यासाठी ग्रामपंचायत सहकार्य करील, असे सरपंच बाबासाहेब कांदळकर यांनी सांगितले. कोरोना संसर्ग रोखण्याच्या व टाळण्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्वरित संस्थात्मक विलगीकरणात उपचार घ्यावेत, असे आवाहन थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केले. प्रास्ताविक सरपंच बाबासाहेब कांदळकर यांनी केले. सूत्रसंचालन सचिन दिघे यांनी केले.