कुकडी ४८ टक्के तर घोड २४ टक्के भरले
By Admin | Updated: September 22, 2015 00:22 IST2015-09-22T00:18:41+5:302015-09-22T00:22:26+5:30
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्प पाणलोट क्षेत्रातील पाऊस थंडावला आहे. पाण्याची थोडी आवक चालू आहे. येडगाव, वडज धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.

कुकडी ४८ टक्के तर घोड २४ टक्के भरले
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्प पाणलोट क्षेत्रातील पाऊस थंडावला आहे. पाण्याची थोडी आवक चालू आहे. येडगाव, वडज धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. कुकडी प्रकल्पात ४८ टक्के तर घोड धरणात २४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
कुकडी प्रकल्पात दि. २१ सप्टेंबर अखेर १४ हजार ७१५ एमसीएफटी ४८ टक्के पाणी साठा आला आहे. गेल्या वर्षी २१ सप्टेंबर अखेर २६ हजार ९३० एमसीएफटी ८६ टक्के पाणीसाठा होता. यावर्षी ३८ टक्के कमी पाणीसाठा आहे. येडगाव धरणात २ हजार ६८१ (९५ टक्के) पाणी साठा झाला. धरणातून १ हजार क्युसेसने सोडलेले पाणी बंद करण्यात आले आहे. वडज धरणात १ हजार ११५ (९५ टक्के)पाणी असून, वडज धरणाच्या कालव्यातून ३०० क्युसेसने पाणी सोडण्यात येत आहे. पिंपळगाव जोगे धरणात १ हजार ५११ (३९ टक्के), माणिकडोह धरणात २ हजार (२० टक्के) तर डिंबे धरणात ७ हजार ४०० (६० टक्के) पाणी साठा झाला आहे. घोड धरणात १ हजार ३०९ (२४ टक्के) पाणी आले. धरणात ३ हजार ५०० क्युसेसने पाण्याची आवक होत आहे.
(तालुका प्रतिनिधी)