मे महिन्यातील शिक्षकांची ड्यूटी अर्जित रजेत रूपांतरित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST2021-06-09T04:25:47+5:302021-06-09T04:25:47+5:30
ड्यूटी केली आहे. त्यामुळे त्यांना मे महिन्याचा पूर्ण वाहन भत्ता, तसेच बुडालेली सुट्टी अर्जित रजेत रूपांतरित करून सर्व्हिस बुकमध्ये ...

मे महिन्यातील शिक्षकांची ड्यूटी अर्जित रजेत रूपांतरित करा
ड्यूटी केली आहे. त्यामुळे त्यांना मे महिन्याचा पूर्ण वाहन भत्ता, तसेच बुडालेली सुट्टी अर्जित रजेत रूपांतरित करून सर्व्हिस बुकमध्ये जमा करावी, अशी मागणी शिक्षक भारतीच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे पत्र आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिले असल्याची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली. सुट्टी काळात कोविड ड्यूटी केलेल्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना मे महिन्याचा पूर्ण
वाहनभत्ता देणेबाबत आणि बुडालेली सुट्टी अर्जित रजेत रूपांतरित करून सर्व्हिस बुकमध्ये जमा करणेबाबत तातडीने आदेश व्हावेत, अशी मागणी सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, मोहंमद समी शेख, योगेश हराळे, जितेंद्र आरु, विजय कराळे, बाबासाहेब लोंढे, महेश पाडेकर, कैलास रहाणे, महादेव डोंगरे, किशोर डोंगरे, संभाजी पवार, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, संतोष देशमुख, महादेव कोठारे, राजेंद्र जाधव, सिकंदर शेख, प्रकाश मिंड, संतोष शेंदुरकर, किसन सोनवणे, नानासाहेब काटे, मुकुंद आंचवले, विलास माने, शरद कारंडे, राजेंद्र हिरवे, विलास वाघमोडे, प्रकाश तनपुरे, अनिल लोहकरे,
बबनराव गायकवाड, नवनाथ घोरपडे, कैलास जाधव, गोरखनाथ गव्हाणे, संजय भुसारी, शंकर भिवसने, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, जया गागरे, संध्या गावडे, अनघा सासवडकर आदींनी केली आहे.