‘नीतल’ने साधला चाहत्यांशी संवाद
By Admin | Updated: November 6, 2016 00:13 IST2016-11-06T00:13:55+5:302016-11-06T00:13:55+5:30
नेवासाफाटा : सिनेअभिनेत्री नीतल शितोळे या अभिनेत्रीने शुक्रवारी नेवासा फाटा येथे चाहत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी दिलखुलास बाचचित केली.

‘नीतल’ने साधला चाहत्यांशी संवाद
नेवासाफाटा : सिनेअभिनेत्री नीतल शितोळे या अभिनेत्रीने शुक्रवारी नेवासा फाटा येथे चाहत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी दिलखुलास बाचचित केली. नीतल हिला पाहण्यासाठी व तिच्यासमवेत छबी काढण्यासाठी तोबा गर्दी झाली होती.
एका खासगी कामानिमित्त नीतल नेवासाफाटा येथे आली होती. यावेळी ‘लोकमत’शी बोलताना ती म्हणाली, ‘ब्रह्यांड नायक साईबाबाह्ण या चित्रपटातून मी लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटातून मी बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. या चित्रपटातून मला खूप काही शिकायला मिळाले. चित्रपटात माझी लक्ष्मीची भूमिका असून, साईबाबांची भक्त असते. चित्रपट समजून घेण्यासाठी साईबाबांवर आधारित अनेक पुस्तके व ग्रंथांचे वाचन करावे लागले. ही माझी ऐतिहासिक भूमिका असल्यामुळे तशी भाषाशैली शिकले. चेहऱ्यावरील हावभावावरही लक्ष केंद्रित केले. जिद्द व मेहनतीच्या जोरावर या भूमिकेला मी न्याय देऊ शकले. त्यामुळे हा चित्रपट निश्चित यशस्वी होईल, असा दावाही तिने केला.
(वार्ताहर)