कारवाईच्या श्रेयावरून तहसीलदार-पोलिसांमध्ये वादावादी
By Admin | Updated: June 25, 2016 00:38 IST2016-06-25T00:30:40+5:302016-06-25T00:38:51+5:30
श्रीगोंदा : पेडगाव शिवारातील भीमा नदी पात्रात वाळू तस्करावर केलेल्या कारवाईच्या श्रेयावरुन तहसीलदार व पोलिसांमध्ये वादावादी झाली.

कारवाईच्या श्रेयावरून तहसीलदार-पोलिसांमध्ये वादावादी
श्रीगोंदा : पेडगाव शिवारातील भीमा नदी पात्रात वाळू तस्करावर केलेल्या कारवाईच्या श्रेयावरुन तहसीलदार व पोलिसांमध्ये वादावादी झाली. यावर तहसीलदारांनी पोलिसांची कानउघाडणी केली. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता श्रीगोंदा पोलीस ठाण्यासमोर ही घटना घडली.
शुक्रवारी सकाळी पोलीस कॉन्स्टेबल निकम वरकाटे यांनी पेडगाव येथे भीमा नदी पात्रात चार वाळूच्या ट्रक पकडल्या. दरम्यानच्या काळात तलाठी लक्ष्मण गराडे नदी पात्रात आले. तेथे पोलीस व तलाठ्यांमध्ये मतभेद झाले. या वादावादीत तस्करी करणाऱ्या वाळूच्या तीन ट्रक पळून नेण्यात आल्या. त्यानंतर तलाठी गराडे यांनी तहसीलदार वंदना खरमाळे यांना माहिती कळविली. तहसीलदार पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांनी संबंधित पोलिसांना धारेवर धरले. दरम्यान, त्यानंतर पोलीस कॉन्टेबल सुनील निकम यांनी भाऊ जयवंत सकट (रा. पेडगाव ), संजय फराटे (रा. मांडवगण फराटा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत भाऊ सकट याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून तीन लाख किंमतीची एक ट्रक व बारा हजार किंमतीची वाळू जप्त करण्यात आली.
(तालुका प्रतिनिधी)