सैनिक बँकेची वादग्रस्त नोकरभरती रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST2021-06-09T04:25:52+5:302021-06-09T04:25:52+5:30
सहकार खात्याने बँकेतील कारभारावर कडक भूमिका घेत विविध मुद्यावर तपासणी सुरू केल्या आहेत. त्यामुळे संचालक मंडळाचे धाबे दणाणले ...

सैनिक बँकेची वादग्रस्त नोकरभरती रद्द
सहकार खात्याने बँकेतील कारभारावर कडक भूमिका घेत विविध मुद्यावर तपासणी सुरू केल्या आहेत. त्यामुळे संचालक मंडळाचे धाबे दणाणले आहेत, असे गेली ५ वर्ष बँकेच्या गैरकारभार बद्दल संघर्ष करणारे जागरूक सभासद विनायक गोस्वामी यांनी सांगितले.
........................
कर्मचाऱ्यांचा पगार वसूल करावा
या नोकरभरतीमुळे बँकेवर आर्थिक भार पडला असून त्यांना दिलेला पगार या संचालकांकडून वसूल करावा. सदर कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा घाट अध्यक्षांनी घातला असून ही भरतीच रद्द करून यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा १४ जूनला आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे पत्र अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे यांनी सहकार आयुक्तांना दिले आहे.
..............................
सैनिक बँक ही ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या आशीर्वादाने व काही माजी सैनिकांच्या त्यागातून उभी राहिलेली आहे. या संस्थेत आर्थिक गैरव्यवहार करण्याचे धाडस व्यवहारे, कोरडे यांनी सत्तेच्या धुंदीत केले आहे. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे ४ गुन्हे दाखल आहेत. आता सहकार खात्याने बँकेतील ठेवीदारांचा पैसा सुरक्षित राहण्यासाठी या संचालक मंडळावर कलम ८८ नुसार कारवाई करून संचालक मंडळ बरखास्त करावे.
-बाळासाहेब नरसाळे, स्वीकृत संचालक, सैनिक बँक