जैन समाजाचे सेवाकार्यात योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:21 IST2021-09-03T04:21:21+5:302021-09-03T04:21:21+5:30
येथील जैनस्थानकामध्ये पद्मऋषीजी महाराज व डॉ. अचलऋषीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आयोजित केलेल्या औषधाविना रोगमुक्ती या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार कानडे ...

जैन समाजाचे सेवाकार्यात योगदान
येथील जैनस्थानकामध्ये पद्मऋषीजी महाराज व डॉ. अचलऋषीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आयोजित केलेल्या औषधाविना रोगमुक्ती या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार कानडे बोलत होते. याप्रसंगी उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर उपस्थित होते. महाराजांच्या मांगलिक पाठानंतर शिबिरास प्रारंभ झाला.
कानडे म्हणाले की, मी पाथर्डी येथील तिलोकरत्न जैन आनंद विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतले. जीवनात सुसंस्कृत व सुशिक्षित झालो. जैन समाज सर्व समाजातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी नेहमीच शिबिरे घेतो. यापूर्वी प्राचीन काळात यज्ञ, यागाचे स्तोम निर्माण झाले होते. यज्ञाच्या माध्यमातून प्राण्यांची आहुती देऊन हिंसा केली जात होती. त्यावेळी भगवान महावीरांनी बंड पुकारून सर्व समाज एकत्र आणला. हिंसा करू नये यासाठी देशभर जागृती केली. भगवान महावीरांनी जगाला जगा आणि जगू द्या, हा मानवतेचा संदेश दिला.
उपनगराध्यक्ष ससाणे म्हणाले, श्रीरामपूरच्या विकासात जैन समाजाचे योगदान आहे. शिबिरामध्ये पुण्याचे निसर्गोपचारतज्ज्ञ चंद्रकांत शहासने यांनी व्यायामाचे प्रकार सांगितले. १५० रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. निसर्गोपचारतज्ज्ञ चंद्रकांत शहासने यांनी आहारासंबंधी मार्गदर्शन केले. अनिल चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष रमेश लोढा यांनी स्वागत केले. याप्रसंगी सतीश कुंकुलोळ, प्रताप गुजर, गोकुळ हिरण, कल्याण कुंकुलोळ, विजय चोरडिया, कांतीलाल हिरण, गणपतलाल मुथ्था, पंकज हिरण, तेजपाल पिपाडा, रमेश रुणवाल आदी उपस्थित होते.
------------
फोटो ओळी : जैनस्थानक
रोगमुक्ती शिबिरात निसर्गोपचारतज्ज्ञ चंद्रकांत शहासने यांचा सत्कार करताना आमदार लहू कानडे आदी.