एड्स जनजागृतीत एनएसएसचे योगदान महत्त्वपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:35 IST2020-12-13T04:35:25+5:302020-12-13T04:35:25+5:30
अहमदनगर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) व रेड रिबन क्लबद्वारा आयोजित एड्स जनजागृती सप्ताहअंतर्गत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी गायकर बोलत ...

एड्स जनजागृतीत एनएसएसचे योगदान महत्त्वपूर्ण
अहमदनगर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) व रेड रिबन क्लबद्वारा आयोजित एड्स जनजागृती सप्ताहअंतर्गत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी गायकर बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.रज्जाक सय्यद, रजिस्टार ए. वाय. बळीद, समन्वयक केशव कापसे, हिंदी विभागप्रमुख ऋचा शर्मा, कार्यक्रम अधिकारी डॉ.मालती येवला, प्रा.अशोक घोरपडे आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या एड्स जनजागृती समितीचे अहमदनगरचे समन्वयक केशव कापसे यांनी स्वयंसेवकांना एड्सविषयी सविस्तर माहिती दिली व चर्चा केली. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली.
सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा.अशोक घोरपडे यांनी केले स्वयंसेवक निलेश फसले याने आभार मानले. यशस्वीतेसाठी स्वयंसेवक ऋतुजा पिटेकर, वैष्णवी पाडे, श्रेयस कांबळे,आकाश देशमाने यांनी परिश्रम घेतले.
--------
फोटो - नगर कॉलेज एनएसएस
अहमदनगर महाविद्यालयातील एन.एस.एस. व रेड रिबन क्लबद्वारा आयोजित एड्स जनजागृती सप्ताह अंतर्गत आयोजित कार्यक्रमप्रसंगी डॉ.बाळासाहेब गायकर, समन्वयक केशव कापसे, प्रा.अशोक घोरपडे आदी.