शहरात प्रभातफेरी काढण्यात आली.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात जागतिक आदिवासी दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष तांबे बोलत होत्या. नेहरू चौकातील अशोक स्तंभास अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब डांगरे यांचा सत्कार करण्यात आला. नेहरू चौक, गांधी, स्वातंत्र्य चौक अशी प्रभातफेरी काढण्यात आली.
स्वातंत्र्यसैनिक डांगरे, काँग्रेस शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक, गुलाब ढोले, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे, निर्मला गुंजाळ, सौदामिनी कान्होरे, अनुराधा आहेर, शालन गुंजाळ, नंदा बागुल, नगरसेवक नितीन अभंग, किशोर टोकसे, प्रा. एम. वाय. दिघे, जीवन पंचारिया, बाळू काळे, लाला दायमा, गणेश मादास, अरुण ताजणे, मुस्ताक शेख, गौरव डोंगरे, शेखर सोसे, राणीप्रसाद मुंदडा, पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ आरगडे, तात्याराम कुटे, जालिंदर ढोक्रट, आदिवासी सेवक बाळकृष्ण गांडाळ, पी. वाय. दिघे, नामदेव कहांडळ, संजय कोल्हे आदी उपस्थित होते.