ट्रॅक्टरला कंटेनरची जोराची धडक, ट्रॅक्टर चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST2021-07-11T04:15:58+5:302021-07-11T04:15:58+5:30

कोपरगाव : कोकमठाणहून कांदा घेऊन कोपरगावच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने जोराची धडक दिली. ही घटना कोपरगाव शहरातील ...

Container hits tractor, kills tractor driver | ट्रॅक्टरला कंटेनरची जोराची धडक, ट्रॅक्टर चालक ठार

ट्रॅक्टरला कंटेनरची जोराची धडक, ट्रॅक्टर चालक ठार

कोपरगाव : कोकमठाणहून कांदा घेऊन कोपरगावच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने जोराची धडक दिली. ही घटना कोपरगाव शहरातील नगर - मनमाड महामार्गावरील संत जनार्दन स्वामी आश्रम जवळ शनिवारी ( दि. १० जुलै ) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालक तरुण शेतकरी जागीच ठार झाला आहे.

शंकर खंडेराव लोहकने ( वय ३०, रा. कारवाडी, कोकमठाण ता. कोपरगाव ) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे कोकमठाण गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

शंकर लोहकने हा शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरमध्ये कांदा भरून कोपरगावच्या दिशेने निघाला असता संत जनार्दन स्वामी आश्रम जवळ पोहोचला असता मागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर क्रमांक ( आर जे ०६, जीसी ४६२४ ) याने ट्रॅक्टर क्रमांक (एम एच १५, डी यु १११०) याला मागून जोराची धडक दिली, धडक इतकी जोराची होती की कांद्याने भरलेला ट्रॅक्टर-ट्रॉली रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी झुडुपात जाऊन पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालक शंकर लोहकने हा गंभीर जखमी झाल्याने त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, तेथे डॉक्टरांनी शंकरचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. याप्रकरणी मयताचा चुलत भाऊ गोकुळ आप्पासाहेब लोहकने ( रा. कारवाडी, कोकमठाण ता. कोपरगाव ) यांच्या फिर्यादीवरून कंटेनर चालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Container hits tractor, kills tractor driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.