राज्यभरातील नेते रासपच्या संपर्कात : महादेव जानकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 13:46 IST2019-01-16T13:45:39+5:302019-01-16T13:46:43+5:30
विधानसभेसाठी पारनेर मतदारसंघातून निलेश लंके सह

राज्यभरातील नेते रासपच्या संपर्कात : महादेव जानकर
अहमदनगर : विधानसभेसाठी पारनेर मतदारसंघातून निलेश लंके सह नगर दक्षिणेतून लोकसभेसाठी तरुण नेता राष्ट्रीय समाज पक्षाच्या संपर्कात असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
जानकर म्हणाले, लोकसभेला सेना-भाजप युती झाली तर राष्ट्रीय समाज पक्ष 2 युती झाली नाही तर पाच जागा मारणार आहे. यामध्ये लोकसभेसाठी नगर दक्षिणची जागाही मागणार आहे. लोकसभा व राज्यसभेतसाठी महाराष्ट्रातील इतर पक्षातील नाराज रासपच्या संपर्कात आहेत. नगर जिल्ह्यातील इच्छुकांबाबत पक्ष सकारात्मक विचार करत आहे. दुष्काळनिवारणासाठी सरकारने सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. शेतक-यांच्या जनावरांना चारा आणि पाणी कमी पडू दिले जाणार नाही. येत्या काही दिवसात राज्यात डिजिटल छावण्या सुरू करणार आहे.