बिबट्याच्या हल्ल्यात बांधकाम मजूर जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 17:47 IST2017-10-11T17:43:44+5:302017-10-11T17:47:56+5:30
राहुरी : देवळाली प्रवरा-लाख रस्त्यावरून घरी पायी जाणा-या बांधकाम मजुरावर बिबट्याने हल्ला चढविला़ यात मजूर जागीच ठार झाला़ ही ...

बिबट्याच्या हल्ल्यात बांधकाम मजूर जागीच ठार
राहुरी : देवळाली प्रवरा-लाख रस्त्यावरून घरी पायी जाणा-या बांधकाम मजुरावर बिबट्याने हल्ला चढविला़ यात मजूर जागीच ठार झाला़ ही घटना मंगळवारी रात्री घडली.
रावसाहेब काशिनाथ बेंद्रे (वय ४८) हे मंगळवारी रात्री घराकडे जाताना कदम वस्तीनजिक आले असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात बेंद्रे यांच्या गळ्याला बिबट्याने चावा घेतला. त्यामुळे मोठा रक्तपात झाला़ ही घटना दिलीप उंडे यांना समजताच त्यांनी जखमी अवस्थेत बेंद्रे यांना राहुरी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र वैरागर यांनी सांगितले. राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, राहुरी तालुका वनपाल उमेश वाघ, गोरख लोंढे यांनी पंचनामा केला़ देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव गाडे यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली.