राज्यात भगवानबाबांची १११ मंदिरे बांधणार
By Admin | Updated: April 15, 2016 23:21 IST2016-04-15T23:17:35+5:302016-04-15T23:21:04+5:30
अहमदनगर : चांगल्या कामाची सुरूवात भगवान बाबांच्या आशीर्वादाने करायची हा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा संदेश राज्यभर पोहचवण्याचा संकल्प जय भगवानबाबा महासंघाने घेतला आहे.

राज्यात भगवानबाबांची १११ मंदिरे बांधणार
बाळासाहेब सानप : शहापूर येथे बाबांच्या मंदिराचे भूमिपूजन
अहमदनगर : चांगल्या कामाची सुरूवात भगवान बाबांच्या आशीर्वादाने करायची हा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा संदेश राज्यभर पोहचवण्याचा संकल्प जय भगवानबाबा महासंघाने घेतला आहे. यासाठी राज्यात बाबांची १११ मंदिरे बांधण्यात येणार असून आतापर्यंत ३८ मंदिरांची उभारणी झालेली आहे. तालुक्यातील शहापूर येथे ३९ व्या मंदिराच्या कामाचा शुभारंभ झाला. त्यावेळी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून हभप रामगिरी महाराज, हभप दत्त दिगंबर महाराज, महासंघाचे जिल्हाध्यक्ष भिमराज आव्हाड, उद्योजक बाबूशेठ नागरगोजे, सरपंच सुधीर पोटे, सरपंच प्रकाश पालवे, संदीप ढाकणे, सदाशिव थोरे, श्याम बडे, प्रदीप घोडके, बाबा सानप आदी उपस्थित होते.
सानप म्हणाले की, जिल्ह्यात महासंघाचे काम भिमराज आव्हाड यांच्यावर सोपवले असल्याने ते ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील. समाजातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महासंघ स्थापन करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहापूर येथील मंदिराच्या कामासाठी स्वत:चे १ लाख ११ हजार १११ रुपये देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. मंदिरातील बाबांच्या मूर्तीसाठी नागरगोजे योगदान देणार आहेत. शहापूरचे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव काळे यांनी मंदिराच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे सिमेंट देण्याचा संकल्प केला असल्याचे सानप यांनी यावेळी जाहीर केले.
मंदिरासाठी जागा नसल्याने श्याम बडे यांनी स्वत:चे राहते घर पाडून मंदिरासाठी जागा दिली. यावेळी गिरिजा गुट्टे, पोटे, नागरगोजे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला सोमेश्वर आव्हाड, गुड्डी उबाळे, शहादेव दहिफळे, सतीश पालवे, बापू चव्हाण, गुलाब पालवे, कृष्णा बेरड, भास्कर पालवे, बाळासाहेब पालवे, अमोल गायकवाड, मच्छिंद्र पालवे आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)