मतदारसंघाचा विकास हाच आपला ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:22 IST2021-08-29T04:22:32+5:302021-08-29T04:22:32+5:30

तालुक्यातील एरंडगाव भागवत येथे आमदार मोनिका राजळे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत विठ्ठल-रुख्मिणी मंदिरासमोर सभामंडप भूमिपूजन, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन लोखंडे ...

Constituency development is our focus | मतदारसंघाचा विकास हाच आपला ध्यास

मतदारसंघाचा विकास हाच आपला ध्यास

तालुक्यातील एरंडगाव भागवत येथे आमदार मोनिका राजळे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत विठ्ठल-रुख्मिणी मंदिरासमोर सभामंडप भूमिपूजन, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन लोखंडे यांनी आयोजित केलेला वृक्षलागवड कार्यक्रम तसेच बूथ आढावा बैठकप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, भाजप किसन मोर्चा प्रदेश सदस्य बापूसाहेब पाटेकर, मंडळ संयोजक भीमराज सागडे, सुनील रासने, भाजप जिल्हा कोषाध्यक्ष विवेक नाईक, महिला आघाडीच्या आशाताई गरड, संजय टाकळकर, कैलास सोनावणे, भाऊसाहेब मुरकुटे, सरपंच गोकुळ भागवत, विष्णू भागवत, शाहूराव भागवत, बूथप्रमुख जगन्नाथ भागवत, मारुती भागवत, भास्कर भागवत, कल्याणराव थोरात, बाळासाहेब पाडळे, दिलीप भागवत, बाबासाहेब धस आदी उपस्थित होते.

एरंडगाव समसूद येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरासमोर सभामंडप कामाचे भूमिपूजन झाल्यानंतर लाखेफळ, दहीफळ नवीन, दहीफळ जुने, बोडखे येथे समर्थ बूथ अभियानांतर्गत बूथ आढावा बैठक झाली.

280821\1816-img-20210828-wa0015.jpg

तालुक्यातील एरंडगाव भागवत येथील मंदिराच्या सभामंडप भूमिपूजन करताना आमदार मोनिका राजळे व इतर मान्यवर.

Web Title: Constituency development is our focus