भुजबळ यांना संपविण्याचे षडयंत्र

By Admin | Updated: September 27, 2016 23:56 IST2016-09-27T23:56:15+5:302016-09-27T23:56:15+5:30

कुकाणा : बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारे नेते छगन भुजबळ यांना सूडबुद्धीने संपविण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी व बहुजनांची

Conspiracy to destroy Bhujbal | भुजबळ यांना संपविण्याचे षडयंत्र

भुजबळ यांना संपविण्याचे षडयंत्र


कुकाणा : बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारे नेते छगन भुजबळ यांना सूडबुद्धीने संपविण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी व बहुजनांची अस्मिता टिकविण्यासाठी ३ आॅक्टोबरच्या नाशिक येथील ओबीसी मूक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी केले.
छगन भुजबळ यांच्यावर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईचा व त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी नाशिक येथे ओबीसींचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी कुकाणा येथे मंगळवारी आयोजित नेवासा तालुक्यातील ओबीसी कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना अभंग बोलत होते. अध्यक्षस्थानी मुळा साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर होते. व्यासपीठावर माजी सभापती कारभारी जावळे, तुषार वैद्य, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम सर्जे, जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड, संजय सुखदान, गणेश गव्हाणे, पं. स.सदस्य शंकर भारस्कर, जनाभाऊ जाधव, संजय शिंदे, डॉ रावसाहेब फुलारी होते. हा मोर्चा एका समाजाचा नसून संपूर्ण ओबीसी समाजाचा असल्याचे अभंग यांनी स्पष्ट केले. नानासाहेब तुवर यांचेही भाषण झाले. नाशिक येथील मोर्चाला मराठा समाजाचा पाठिंबा असल्याचे गणेश गव्हाणे यांनी तर मागासवर्गीय समाजाचा पाठिंबा असल्याचे संजय सुखदान यांनी जाहीर केले.
पुरुषोत्तम सर्जे, देवराम सरोदे, रावसाहेब जावळे, पांडुरंग अनारसे, रामदास नजन, शंकरराव भारस्कर, संतराम चौधरी, बाबासाहेब घुले, बाळासाहेब एकनाथ जावळे, अशोक मिसाळ, अमोल अभंग, प्रशांत शिंदे यांचीही भाषणे झाली.
बैठकीस दत्तात्रय काळे, गुलाबराव आढागळे, पावलस गोर्डे, यडुभाऊ सोनवणे, राजहंस मंडलिक, रामचंद्र गंगावणे, दादा गजरे, अनिल पंडित, देविदास साळुंके, अमित रासने, बाबासाहेब गायकवाड, एकनाथ राऊत, सुनील वाघमारे, राजेंद्र परशैय्या, जनाभाऊ तांबे, डॉ संजय दरवडे, डॉ. रजनीकांत पुंड, आबासाहेब काळे हजर होते. यशवंत पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Conspiracy to destroy Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.