माझ्याविषयी गैरसमज निर्माण करण्याचे षडयंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:31 IST2021-02-05T06:31:49+5:302021-02-05T06:31:49+5:30
कोपरगाव नगर परिषदेच्या सोमवारी १ फेब्रुवारीला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कोल्हे गटाच्या (भाजपा) नगरसेवकांनी ३१ पैकी फक्त तीनच कामांना ...

माझ्याविषयी गैरसमज निर्माण करण्याचे षडयंत्र
कोपरगाव नगर परिषदेच्या सोमवारी १ फेब्रुवारीला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कोल्हे गटाच्या (भाजपा) नगरसेवकांनी ३१ पैकी फक्त तीनच कामांना मंजुरी देत उर्वरित २८ कामांचे फेरअंदाजपत्रक तयार करून फेर निविदा काढावी, ती आम्ही मंजूर करू अशी भूमिका घेतली होती. त्यावर नगराध्यक्ष वहाडणे यांनी या मागील वस्तुस्थिती मांडण्यासाठी मंगळवारी (दि.२) त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
वहाडणे म्हणाले, या बैठकीत भाजपच्या नगरसेवकांनी जीवन प्राधिकरण कार्यालयाकडून तांत्रिक मान्यता घेतली आहे. ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घ्यावी अशी मागणी केली आहे. परंतु, नगरपरिषदेत यापूर्वी यांचीच सत्ता असताना शेकडो कामे जीवन प्राधिकरणकडून तांत्रिक मान्यता घेऊन केली आहे. मग आम्हालाच विरोध का ? ही शासनानेच नेमून दिलेली एजन्सी आहे. या मंडळींनी गेली चार वर्ष आपल्या प्रभागातील सर्वच कामे माझ्याकडून करून घेतली. त्यावेळी यांना जीवन प्राधिकरणच्या मंजुरीची अडचण नव्हती परंतु, आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता होणाऱ्या सर्वच कामात शहरातील सर्वच महत्वाचे मुख्य रस्ते आहेत. ही सर्व कामे झाली तर वहाडणे यांच्या विरोधात बोलण्यासाठी काहीच शिल्लक राहणार नाही अशी त्यांना भीती वाटते. विशेष म्हणजे निविदा कितीही असली तरीही प्रत्यक्षात जेवढे काम होईल तेवढीच रक्कम अदा केली जाते. उर्वरित रक्कम तशीच राहते. हे सर्व या मंडळींना माहिती आहे. तरी देखील जाणीवपूर्वक अडथळे आणण्याचे काम केले जात आहे.